घरमनोरंजनए आर रहमान याला पोलिसांचा दणका, शो रंगात असताना बंद पाडला

ए आर रहमान याला पोलिसांचा दणका, शो रंगात असताना बंद पाडला

Subscribe

प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान याला पुणे पोलिसांनी दणका दिला आहे. रहमान याचा पुण्यात शो होता. पण शो ऐन रंगात आला असतानाच त्याचा शो पोलिसांनी बंद पाडला. त्याचसोबत त्याला सुनावले सुद्धा. ए आर रहमानचा शो पुण्यातील राजाबहाद्दुर मिल परिसरात हा शो होता.

रहमान येणार असल्याने त्याच्या चाहत्यांनी खुप गर्दी केली होती. ऐवढेच नव्हे तर पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारी सुद्धा त्या कार्यक्रमाला हजर होते. शो हा रात्री १० नंतर ही सुरु राहिल्याने पोलिसांनी स्टेजवर येत हो बंद करायला लावला.

- Advertisement -

शो बंद करताना त्याला १० नंतर शो कसा काय सुरु ठेवू शकता असे विचारलेच. पण रात्री १०नंतर कार्यक्रम करण्यास कोर्टाने बंदी सुद्धा घातली आहे हे तुम्हाला माहिती नाही का असे ही विचारले. यावर रहमान याने पोलिसांशी कोणताही वाद घातला नाही आणि स्टेजवरुन निघून गेला. मात्र यावेळी त्याच्या चाहत्यांचा हिरमोड झाला.

या प्रकरणी पुणे पोलिसांच्या एका अधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे की, ए आर रहमान आपले शेवटचे गाणे गात होता. परंतु त्यांना माहिती नव्हते की, रात्रीचे १० वाजले आङेत. त्यामुळेच जे पोलीस अधिकारी कार्यक्रमास्थळी पोहचले त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या गाइडलाइन्सनुसार रहमान यांना सांगितले. त्यानंतरच रहमान याने आपले गाणे बंद केले.

- Advertisement -

हेही वाचा- भाईजानला आता ‘अब्बा’ होण्याची इच्छा; पण…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -