Friday, May 14, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन हिंदी बोलण्यास विरोध केलेल्या व्हायरल व्हिडिओ बाबत ए आर रेहमान यांनी...

हिंदी बोलण्यास विरोध केलेल्या व्हायरल व्हिडिओ बाबत ए आर रेहमान यांनी केला खुलासा

ए आर रेहमान यांचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओ वरून रेहमान यांना नेटकर्‍यांनी चांगलच ट्रोल केल आहे.

Related Story

- Advertisement -

जगविख्यात ऑस्कर विजेते ख्यातनाम गायक ए आर रेहमान यांचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओ वरून रेहमान यांना नेटकर्‍यांनी चांगलच ट्रोल केल आहे. ’99 सॉन्ग’ या  आगामी चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओ मध्ये रेहमान तेथे उपस्थित असलेल्या अॅकर ला हिंदी बोलण्यावरून विरोध करतो. तसेच मंचावरून निघून जातो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Surya (@suryasurya5073)

- Advertisement -

रेहमान यांनी एका मुलाखती दरम्यान व्हायरल व्हिडिओ बाबत खुलासा केला आहे.”99 सॉन्ग’ या चित्रपटाचे संगीत तीन भाषेमध्ये रिलीज होणार आहे. त्यापैकि हिंदी मध्ये ’99 सॉन्ग’ हा चित्रपटाचे संगीत रिलीज करण्यात आले आहे. सध्या प्रमोशन फक्त तामिळ भाषेसाठी करण्यात आले होते. आम्ही तामिळ प्रेक्षकान सोबत संवाद साधत होतो. तेथील प्रेक्षक आधीच अभिनेता एहान च्या रंगावरून प्रश्न उपस्थित करत होते. आणि म्हणूनच सगळ्यांना तामिळ मध्ये बोलण्यास संगितले. तसेच माला वाटते की अॅकर ने एहान ला खुश करण्यासाठी हिंदीत बोलत असणार. म्हणून मी तिला बोललो ‘हिंदी? आणि मंचावरून खाली उतरलो’ मी फक्त मस्ती करत होतो. पण लोकांनी याचा मुद्दा बनवला याचे मला खूप वाईट वाटले. पण एका प्रकारे व्हिडिओ व्हायरल झाल्याने  प्रमोशन चा खर्च देखील वाचला” अशा प्रकारच्या रंगीत अंदाजात रेहमान याने व्हायरल व्हिडिओ बाबतचा खुलासा केला.
विश्वेश कृष्णामूर्ति यांनी ’99 सॉन्ग’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केल आहे. तसेच या चित्रपटात अभिनेता एहान भट्ट आणि अमेरिकन अभिनेत्री एडिसली वर्गेस यांची मुख्य भूमिका आहे. ए आर रेहमान यांच्या प्रोडक्शन अंतर्गत 16 एप्रिल ला चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे.

- Advertisement -