Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन श्री हनुमानांसाठी चित्रपटगृहात एक सीट ठेवणार आरक्षित; 'आदिपुरुष'च्या निर्मात्यांची घोषणा

श्री हनुमानांसाठी चित्रपटगृहात एक सीट ठेवणार आरक्षित; ‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांची घोषणा

Subscribe

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘आदिपुरुष’ चित्रपट मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता प्रभास प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणार आहे. नुकत्याच काही ‘आदिपुरुष’चा ट्रेलर आणि चित्रपटातील गाणी प्रदर्शित झाली होती ज्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी या चित्रपटाची टीम जबरदस्त प्रमोशन करताना दिसत आहे. दरम्यान, अशातच या चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाबाबत एक मोठी घोषणा केली आहे.

‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांची मोठी घोषणा

‘आदिपुरुष’च्या चित्रपटाबाबत सतत नवनवीन अपडेट समोर येत आहे. नुकतीच या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक निर्णय घेतला आहे की, चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान प्रत्येक चित्रपटगृहामध्ये एक सीट रिकामी ठेवावी. ही सीट भगवान हनुमानांसाठी असणार आहे. कारण, असं म्हटलं जातं की, ज्या ठिकाणी रामायणाचा पाठ असतो. त्याठिकाणी भगवान हनुमान उपस्थित असतात. त्यामुळे निर्मात्यांनी प्रत्येक चित्रपटगृहात एक सीट रिकामी ठेवणार असल्याची घोषणा केली आहे.

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 2 कोटींचा खर्च

- Advertisement -

आदिपुरुष: रिलीजपूर्वी आदिपुरुषच्या टीमची मोठी घोषणा, या कारणामुळे प्रत्येक चित्रपटगृहात एक जागा रिकामी ठेवणार

मिळालेल्या माहितीनुसार, ‘आदिपुरुष’च्या प्री-रिलीज इव्हेंटसाठी निर्माते 2 कोटींचा खर्च करणार आहेत. ही मोठी रक्कम निर्माते चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खर्च करणार आहेत. शिवाय यात निर्माते रिलीजपूर्वीच्या इव्हेंटमध्ये फक्त फटाक्यांवर 50 लाख रुपये खर्च करणार आहेत. या चित्रपटाचे हक्क आदिपुरुषने तेलुगु थिएटरला जवळपास 170 कोटींना विकले आहेत. शिवाय या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वी देखील कमाई केली आहे.

चित्रपट ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार

- Advertisement -

ओम राउत यांच्या दिग्दर्शनात तयार करण्यात आलेल्या ‘आदिपुरूष’ चित्रपटाने प्रभास श्रीरामाच्या मुख्य भूमिकेत होता. तर सीतेच्या भूमिकेत अभिनेत्री कृति सेनन आणि सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट 16 जून 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 


हेही वाचा :

स्वरा भास्करने दिली गुड न्यूज; बेबी बंपसह शेअर केला फोटो

- Advertisment -