सेटवरून रात्री घरी परतताना अभिज्ञा भावे सोबत ठाणे परिसरात घडली धक्कदायक घटना

अलीकडे आपल्या आजूबाजूला अनेक विचित्र प्रकार घडलेले आपण पाहतो. चोरी, हत्या, विनयभंग असे अनेक प्रकार वारंवार आपल्याला ऐकायला येतात. आता अशीच एक धक्कदायक घटना मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावे सोबत घडलेली आहे. अभिज्ञाने तिच्या फेसबुक अकाउंटवर ही याबाबत माहिती दिली आहे.

अभिज्ञा पोस्टमध्ये म्हणतेय की, “आजकाल मी माझ्या सोशल मीाडियाचा वापर फार कमी प्रमाणात करते. परंतु माझ्यासोबत नुकतीच घडलेली धक्कादाटक घटना मला सर्वांना सांगायची आहे. कारण मला माहिती आहे की तुमच्यापैकी अनेकांना या परिस्थीतीचा सामना करावा लागला असेल किंवा माझा हा अनुभव तुम्हाला अशा घटनेपासून वाचवू शकेल!!”


“मी माझ्या शूटिंगचे काम आटपून, १०.३० पर्यंत पॅकअप केलं. घरी जाण्यासाठी माझ्याकडे माझी कार नसल्याने मी रिक्षाने घरी जायचं ठरवलं. रिक्षा मिळाल्यानंतर १० मिनीटांनी ११.१५ च्या सुमारास ठाण्यातील विवियाना ब्रिज फ्लायओव्हरवर अचानत रिक्षाच्या डाव्याबाजूला बाईकवरून दोन जण आले आणि माझा मोबाईल हातातून हिसकावून घेतला. यामध्ये माझ्या हातालासुद्धा दुखापत झाली आहे. रिक्षाचालकाने त्यांचा पाठलाग करण्याचा खूप प्रयत्न केला पण आम्ही अयशस्वी झालो.हि पोस्ट लिहिण्यामागे माझा फक्त इतकाच उद्देश आहे की, ठाणे आणि मुंबईतील परिसरात सुरक्षेची वाढ करावी. अनेक सामान्य व्यक्तींसोबत वारंवार असे प्रकार घडत असतात. त्यामुळे रस्त्यावर सुरक्षा कॅमेरे लावावे.”

 


हेही वाचा : ‘Cirkus’ चित्रपटानंतर रणवीर सिंह आणि रोहित शेट्टी नव्या चित्रपटासाठी पुन्हा एकत्र