एक चविष्ट ‘संजय राऊत’… किरण मानेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

किरण माने यांच्या नव्या पोस्टमधून त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यात त्यांनी लिहिलंय की

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच उलथापालथ झाली, एकनाथ शिंदेंच्या बंडापासून ते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होईपर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. यादरम्यान अनेक क्षेत्रातील लोक आपलं मत मांडत होते. तसेच मनोरंजन सृष्टीतील कलाकारही आपलं मत सोशल मीडियाद्वारे शेअर करत होते. दरम्यान आता अभिनेते किरण माने सुद्धा पुन्हा एक नवी प्रतिक्रिया शेअर केली आहे.

किरण माने यांच्या नव्या पोस्टमधून त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यात त्यांनी लिहिलंय की, “साधारणपणे सव्वापाच वाट्या किरीट सोमैय्या, साडेतीन टेबलस्पून चंद्रकांतदादा, अर्धा चमचा उपाध्ये किंवा वाघताई – दोघांपैकी जे हाताशी असेल ते.. वरून चिमूटभर गुणरत्न सदावर्ते टाकायचे.. याचं मिश्रण एकजीव करून खरपूस तळलं की एक चविष्ट ‘संजय राऊत’ तयार होतात !” अश्या गमतीदार शब्दांमध्ये किरण माने यांनी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.

सध्या किरण मानेंची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली असून फेसबुकवर युजर्स अनेक कमेंट करत आहेत. “काटा किर्रर्रर्रर्र…रेसिपी एकदम ओक्क्के हाय”, अश्या अनेक कमेंट युजर्स करत आहेत.

दरम्यान किरण माने सोशल मीडियावर खूप बऱ्यापैकी सक्रिय असतात. ते नेहमी विविध विषयांवर आपलं मत मांडत असतात. मागील काही महिन्यांपूर्वी स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत विलास पाटील ही भूमिका साकारणाऱ्या किरण माने यांना ने राजकीय भूमिका घेत असल्याचे कारण देत मालिकेतून काढून टाकण्यात आलं, असा आरोप त्यांनी केला होता. तेव्हापासून ते वारंवार चर्चेत असतात.


हेही वाचा :पवार म्हणजे धर्म नाहीत… केतकी चितळेने मांडली स्वत:ची बाजू