घरमनोरंजन“कोकणकन्या रिटर्न” मधून घडणार कोकणची सफर !

“कोकणकन्या रिटर्न” मधून घडणार कोकणची सफर !

Subscribe

नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने आपण गाव सोडून शहरात आलो खरे पण ती गावची गोडी इथे नाही अशीच कोकणातल्या एका गावाची गोष्ट तुम्हाला पहायला मिळणार आहे

आज आपण मोठ-मोठ्या महानगरात आणि आलिशान ऑफिस आणि घरात राहत असलो तरी आपल्या सगळयांची नाळ ही गावाशी जोडली गेली आहे. नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने आपण गाव सोडून शहरात आलो खरे पण ती गावची गोडी इथे नाही अशीच कोकणातल्या एका गावाची गोष्ट तुम्हाला पहायला मिळणार आहे ते, “कोकणकन्या रिटर्न” या कॅफे मराठीच्या नव्या युट्यूब सीरिजमधून. ही गोष्ट आहे राधाची आणि तिच्या भाव-विश्वाची. अनेक वर्ष आपल्या गावापासून दूर राहिलेली राधा अचानक काही कामानिमित्त आपल्या गावी कोकणात परतते. इथे आल्यावर तिला आपले घर, बालपणाच्या गोष्टी आठवू लागतात.

गावची माती आणि नाती यांची खरी गोडी तिला आपल्या कोकणातल्या या छोट्याश्या गावात लोकांना भेटून येते. गावातल्या लोकांचे निरागस वागणे, तेवढ्याच जोरात भांडण करून पुन्हा दुसऱ्या क्षणी गोड होणे. एकमेकांच्या सुख-दुखात सामील होणे, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधणे. खरतर राधा सोबत आपण प्रेक्षक म्हणून सुध्दा आपल्या गावच्या आठवणीत रमून जातो. ही सीरिज म्हणजे आपल्या गावाची एक सफ़र आहे.ृगावची धमाल-मस्ती सोबत यातली सगळ्यात महत्वाची आणि जमेची बाजू म्हणजे निसर्गरम्य कोकण, तिकडची साधी भोळी माणसं आणि तिकडच्या भाषेचा गोडवा. गावची माती आणि नाती यांचा एक मेळ इथे आपल्याला नव्याने अनुभवायला मिळतो. कॅफे मराठीच्या निखिल रायबोले अणि भूपेंद्रकुमार नंदन यांची निर्मिती असून, लेखक रोहन कदम तर कथा,पटकथा आणि दिग्दर्शन सुयोग हांदे यांचे आहे आशय प्रमुख कोमल कुडाळकर आहेत.

- Advertisement -

सिरीजमध्ये राधा ही मध्यवर्ती भूमिका वैष्णवी खाडे हिने साकारली आहे तर तिच्यासोबत अस्सल कोकणचे स्थानिक कलाकार अमोल रेडीज, अमित कुबड़े, प्रितेश रहाटे, तेजस घाडीगावकर, किशोर साळुंखे , प्रितम जाधव, ओमकार गावडे, जगदीश शेलार, राजेश गोसावी, स्नेहा पांचाळ, दामिनी भिंगार्डे इ. कलाकारांच्या अभिनयामुळे सिरीजला रंगत आली आहे. गीते अनिकेत कदम यांची असून, संगीत भाग्येश पाटील यांचे आहे, कोकणच्या मातीतले लोकप्रिय गायक रत्नाकर महाकाळ बुआ यांच्या आवाजाने सिरीजला अस्सल कोकणचा गोडवा आला आहे.


हेही वाचा :

आमीर खान आणि कियारा अडवाणीने जाहिरातीमधून हिंदूंच्या प्रथेची उडवली खिल्ली… विवेक अग्निहोत्रींचा आरोप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -