घरमनोरंजनअस्तिकाला नागरूपात आणण्यासाठी अनोखे महानाट्य घडणार

अस्तिकाला नागरूपात आणण्यासाठी अनोखे महानाट्य घडणार

Subscribe

सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत अस्तिकाला सर्वांसमोर नागरूपात आणण्यासाठी एक अनोखे महानाट्य घडणार आहे. यज्ञ करण्याचा प्रयत्न केल्यामुळे रूपालीमधील विरोचक नेत्राला घाबरू लागतो. अशातच नेत्रा आणि इंद्राणीला विरोचकाच्या सेवकाचे रूप घेतलेल्या अस्तिकाला सर्वांसमोर नागरूपात आणण्याचा मार्ग भालबांमुळे सापडतो. नेत्राबरोबर घरातले सर्वजण गरुडदेवाच्या आरतीची तयारी करतात, घरामध्ये गरुडदेवाची मूर्ती आणली जाते. अस्तिकाला नागरूपात आणण्याचा मार्ग सांगितल्यानंतर भालबा आणि मंगला वावोशीला जायला निघतात. त्याचवेळी रूपाली दारात उभी राहून त्यांना भीती घालण्याचा प्रयत्न करते.

पण ते दोघेही ठामपणे रूपालीला तोडीस तोड उत्तर देतात. विरोचकाचा वध माझ्या नेत्राच्या हातून होणारच असा निर्धार ते व्यक्त करून निघून जातात. रूपाली त्यामुळे बिथरते. त्याच दिवशी अस्तिकाला गरुडाच्या किंकाळ्या ऐकू येऊ लागतात आणि ती हैराण होते आणि घाबरून रुपालीच्या खोलीत जाते. “विरोचका मला वाचवा” अशी विनंती ती करू लागते. पण अस्तिका आणि रूपाली दोघींनाही नेत्रा आणि इंद्राणीच्या खेळीचा अंदाज येत नाही आणि त्या दोघीही नेत्रा-इंद्राणीने युक्तीने टाकलेल्या जाळ्यात अडकतात.

- Advertisement -

नागरूपात अस्तिकाला आणण्याची नेत्राची युक्ती यशस्वी होणार का? अस्तिका नागरूपात आल्यावर नेत्रा तिला कोणती शिक्षा देईल? हे आपल्याला गुरुवारी २२ फेब्रुवारीच्या भागात आपल्याला पहायला मिळणार आहे.

 

- Advertisement -

हेही वाचा :

अक्षया हिंदळकर आणि अक्षय म्हात्रेची नवी मालिका ‘पुन्हा कर्तव्य आहे’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -