Monday, May 10, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन सलमानच्या 'राधे'च्या एक आठवडा आधीच शाहरूखचा 'प्रेमांतूर' रिलिज होणार

सलमानच्या ‘राधे’च्या एक आठवडा आधीच शाहरूखचा ‘प्रेमांतूर’ रिलिज होणार

बॉलिवूडच्या किंग खानचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही बातमी वाचून शाहरुखच्या चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली असेल.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडच्या किंग खानचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही बातमी वाचून शाहरुखच्या चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली असेल. गेल्या काही दिवसांपासून शाहरुख मोठ्या पड्यापासून दूर आहे. त्याचा एकही चित्रपट अद्याप रिलीज झाला नाहीये. चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर चाहत्यांची इच्छा आता शाहरुख खान नाही तर त्याचा डुप्लिकेट पूर्ण करणार आहे. आणि ते सुद्धा बॉलिवूड दबंग स्टार सलमान खानच्या बहुचर्चित ‘राधे’ चित्रपटाच्या आठवडा भर आधीच शाहरुख खान चा प्रेमांतूर चित्रपट रिलीज होणार असल्याच्या चर्चा सध्या रंगत आहे . प्रशांत वालदे गेल्या १५ वर्षा पासून शाहरुखचा बॉडी डबल म्हणून त्याच्या सोबत काम करत आहे. आता खुद्द प्रशांत एक नवा कोरा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.प्रशांतचा ‘प्रेमांतूर’ चित्रपट ७ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा एक थ्रिलर, हॉरर आणि रोमॅंटिक असा चित्रपट असणार आहे. आणि हा चित्रपट प्रशांत ने शाहरुखला समर्पित केला आहे.

- Advertisement -

 

कल्याणी कुमारी, श्रीराज सिंह, अमित सिन्हा, वीर सिंह सणी बिंध्या कुमारी कलाकार दिसणार आहेत.चित्रपटाच निर्देशन सुमित सागर यांनी केलं आहे . अभिनया व्यतिरिक्त प्रशांतने ‘प्रेमांतूर’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद लिहले आहेत आणि चित्रपटाची निर्मिती सुद्धा केली आहे. त्याच्या सोबतच शांतनु घोष, सत्या यांनी सह निर्मिती केली आहे.

- Advertisement -

प्रशांत मूळचा नागपुरचा असून त्याने शाहरुख सोबत ओम शांती ओम, डॉन २, चेन्नई एक्सप्रेस, फॅन अशा अनेक सुप्रसिद्ध चित्रपट आणि जाहिरातींमध्ये काम केलं आहे.


हे हि वाचा – खिलाडी अक्षय कुमारने पुन्हा जिंकल मन, गौतम गंभीरच्या संस्थेला दिला मदतीचा हात

- Advertisement -