घरमनोरंजनएक अद्भुत माणूस... सतीश कौशिक यांना अमिताभ यांनी वाहिली श्रद्धांजली

एक अद्भुत माणूस… सतीश कौशिक यांना अमिताभ यांनी वाहिली श्रद्धांजली

Subscribe

अभिनेते सतीश कौशिक यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. 9 मार्च रोजी सतीशने अचानक जगाचा निरोप घेतला. हा काळ त्याच्या कुटुंबासाठी आणि मित्रासाठी खूप कठीण आहे. अभिनेत्याच्या अंत्यसंस्कारात अनुपम खेर रडताना दिसले. शिवाय अनेक कलाकारांनी देखील त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. दरम्यान, अशातच आता बॉलिवूडचे महानायक अमित बच्चन यांनी सतीश कौशिक यांची आठवण काढत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सतीश कौशिक यांना अमिताभ यांनी वाहिली श्रद्धांजली

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले, ‘आम्ही आणखी एकाला गमावले आहे. एक अद्भुत माणूस, एक अद्भुत अभिनेता जो आपल्या करिअरच्या शिखरावर होता… सतीश कौशिक… तुमच्यासोबत काम करणे प्रेरणादायी होते… आणि मला देखील खूप काही शिकायला मिळाले… मी प्रार्थना करतो…’

- Advertisement -

या चित्रपटांमध्ये दिसले होते एकत्र

अमिताभ बच्चन यांनी 1998 मध्ये आलेल्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटात सतीश कौशिकसोबत काम केले होते. या चित्रपटात सतीश यांनी शराफत अली नावाची व्यक्तिरेखा साकारली, ज्याने प्रेक्षकांना खूप हसवले. याशिवाय तो अमिताभ यांच्या ‘हम किसी से कम नहीं’ चित्रपटात पप्पू पेजरच्या भूमिकेत आणि ‘गॉड तुस्सी ग्रेट हो’मध्ये भोलाराम सच्चाच्या भूमिकेत दिसले होते.

हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा दावा

सतीश कौशिक यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे म्हटलं जात असलं तरी आता याबाबत नवीन खुलासे समोर येत आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दिल्लीतील फार्महाऊसमधून काही औषधे जप्त करण्यात आली आहेत. या फॉर्महाऊसमध्ये 66 वर्षीय कौशिक मृत्यूपूर्वी एका पार्टीत सहभागी झाले होते. यानंतर त्यांचा विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. महिलेने दाखल केलेल्या तक्रारीची प्रत पाहिल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितेल की, या महिलेशी आमचे बोलणे झाले आहे. तिने पूर्वनियोजित हत्या असल्याचे आम्हाला सांगितले आहे.

- Advertisement -

हेही वाचा :

मित्राच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी अनुपम खेर यांनी घेतलं काली मातेचं दर्शन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -