Samantha Raut Prabhu: समांथा दिसणार Bisexual डिटेक्टिव्हच्या भूमिकेत! आंतरराष्ट्रीय चित्रपटात झळकणार

समांथा नागा चैतन्य यांच्या घटस्फोटामुळे फॅन्स प्रचंड नाराज झाले होते. मात्र समांथाने दिलेल्या हा माहितीनंतर तिचे फॅन्स चांगलेच खुश झाले आहेत

Actress Samantha Ruth Prabhu play bisexual tamil women in arrangement of love first foreign film
Samantha Raut Prabhu: समांथा दिसणार Bisexual डिटेक्टिव्हच्या भूमिकेत! आंतरराष्ट्रीय चित्रपटात झळकणार

दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ (Samantha Raut Prabhu) प्रभु गेल्या काही दिवसात तिच्या घटस्फोटोमुळे चर्चेत आली होती. समांथाने तीन महिन्यांपूर्वीच पती नागा चैतन्यासोबत घटस्फोट घेतला आणि त्यांच्या फॅन्सना मोठा धक्का बसला. मात्र अभिनेत्री समांथा आता स्टेबल झाली असून तिच्या प्रोफेशनल लाइफवर फोकस करताना दिसत आहे. समांथाने नुकताच एक मोठा सिनेमा साइन केला आहे. ‘अरेंजमेंट ऑफ लव्ह’ हासमांथाचा नवा सिनेमा आहे. समांथा पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सिनेमात झळकणार आहे. विशेष म्हणजे समांथा सिनेमात एका ‘बायोसेक्शुअल डिटेक्टिव्ह’ची भूमिका साकारणार आहे.  समांथाने तिच्या सोशल मीडियावर सिनेमाच्या दिग्दर्शकासोबतचा फोटो शेअर करत तिच्या या नव्या सिनेमाची माहिती तिच्या चाहत्यांना दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)


बाल्टा अवॉर्ड विजेते डायरेक्टर फिलिप जॉन या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. फिलीप जॉन यांनी अनेक प्रसिद्ध टिव्ही शो केले आहेत. ‘द गुड कर्मा हॉस्पिटल’ आणि ‘डाउनटाउन’ सारखे अनेक हिट शो त्यांच्या नावे आहेत. अशा मोठ्या व्यक्तिसोबत काम करण्याची संधी मिळाल्याने समांथाचे नशीब उजळले असेच म्हणावे लागेल. समांथाला तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये मिळालेला हा सर्वात मोठा ब्रेक म्हणावा लागेल. सुनीता टाटीचे प्रोडक्शन हाऊस गुरु ‘अरेंजमेंट ऑफ लव्ह’ या सिनेमाची निर्मिती करणार आहेत.

हा सिनेमा २००४साली ‘अरेंजमेंट ऑफ लव्ह’ याच नावे आलेल्या एका बेस्ट सेलिंग नोव्हेलवर आधारित आहे. समांथा या सिनेमात एका बायोसेक्शुअल डिटेक्टिव्हची भूमिका साकारणार आहे. समांथा नागा चैतन्य यांच्या घटस्फोटामुळे फॅन्स प्रचंड नाराज झाले होते. मात्र समांथाने दिलेल्या हा माहितीनंतर तिचे फॅन्स चांगलेच खुश झाले आहेत आणि समांथाला तिच्या नव्या प्रोजेक्टसाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

समांथाने द फॅमिली२ या सिनेमानंतर दक्षिण भारतातच नाही तर उत्तर भारतातही आपली फॅन फॉलोव्हिंग बनवली आहे. समांथाच्या सध्याच्या वर्क फ्रंटविषयी बोलायचे झाले तर समांथा अल्लू अर्जुन आणि रश्मिता मंदाना यांच्या पुष्पा या सिनेमात दिसणार आहे. लवकरच या सिनेमाचे शुटींग सुरू होणार आहे.


हेही वाचा – Swara Bahskar: अभिनेत्री स्वरा भास्कर होणार आई, म्हणाली मुलासाठी अजून थांबू शकत नाही