घरताज्या घडामोडीDiwali 2021: महाराष्ट्राची लाडकी आई देतेय दिवाळीच्या शुभेच्छा

Diwali 2021: महाराष्ट्राची लाडकी आई देतेय दिवाळीच्या शुभेच्छा

Subscribe

अभिनेत्री 'मधुराणी गोखले प्रभुलकर' यांनी माय महानगरसोबत मारलेल्या दिलखुलास गप्पा. 

आई म्हणून बायको म्हणून सून म्हणून तिच्या प्रसंगानुरूप वागणुकीत बदल होतो परंतु प्रत्येक नात्यात ‘अरुंधती’ आदर्श वाटते. ‘आई कुठे काय करते’ असं मालिकेच टायटल असल तरी घर सुरळीत फक्त आईमुळे होतं आणि आईच कुटुंब जोडून ठेवते, घराला घरपण देते हे मात्र मालिका पाहत असताना जाणवत राहत. अशाच सिरीअल मधील आपल्याला आवडणाऱ्या आईसोबत म्हणजेच अभिनेत्री ‘मधुराणी गोखले प्रभुलकर’ यांनी माय महानगरसोबत मारलेल्या दिलखुलास गप्पा.

  • आई कुठे काय करते मधील अरुंधतीने मालिका विश्वात एक वेगळ स्थान निर्माण केल त्याविषयी काय सांगाल?

आज पर्यंत ज्या ज्या आईनी कष्ट घेतले त्या आईची कृपा अरुंधतीवर आहे. म्हणूनच या संपूर्ण मालिकेच्या टीमला त्यांच्या कष्टांना यश मिळतय असं नक्की म्हणता येईल.

- Advertisement -
  • मधुराणी म्हणून अरूंधतीकडे कस बघतेस?

अरुंधती सारखीच मी सुद्धा एका मुलीची आई आहे. अरुंधतीकडून मी खूप काही शिकते कारण ती तिच्या तिनही मुलांना उत्तम वाढवतेय. इशाच्या एका सिनमध्ये तिला अन्न वाया घालवू नये असं शिकवताना तिचं समजावणं असेल किंवा करिअर आणि लाईफ पार्टनर बद्दलचे डिसीजन असतील कायमच अरुंधती आई म्हणून साथ देते. हे सगळं समजून घेताना माझ्या मुलीला वाढवताना या गोष्टी मला नक्की उपयोगी पडतील.

  • मधुराणीला घरुन कसा पाठिंबा आहे सिरीअलसाठी?

घरातल्या पाठिंब्यामुळे खरंतर अरुंधती तुमच्या समोर येतेय कारण माझी फॅमिली सगळी पुण्यात असते आणि आमचं शुटींग मुंबईमध्ये असतं. मी मालिकेत शूटिंग मध्ये बिझी असले तरीदेखील माझं लक्ष तिच्याकडे असत. कारण आता फोन व्हिडिओ कॉल अशा सोयी आहेत पण नक्कीच मी माझ्या कुटुंबाला मिस करते.

- Advertisement -
  • जी नवीन पिढी अभिनय क्षेत्रात करियर करू पाहतेय त्यांना काय मार्गदर्शन कराल?

या क्षेत्रात खरंच यायच असेल तर या. नुसती मजा मजा म्हणून येऊ नका. प्रामाणिकपणे कष्ट करायची तयारी असेल तरच इथे या. या क्षेत्रात यायचं असेल तर भरपूर वाचा. भरपूर पाहा आता ऑनलाईन जगात हे सगळं उपलब्ध आहे आणि अशी जर आपापली तयारी करून आलात तर जास्त काळ इथे टिकता येईल.

  • दिवाळीचे यावर्षीचे काय स्पेशल प्लॅनिंग आहेत?

यावर्षी दिवाळीत आम्हाला सुट्टी आहे त्यामुळे कुटुंबासोबत दिवाळी साजरी करणार आहे. मला गिफ्ट विकत घ्यायची खूप हौस आहे ..दुसऱ्यांना गिफ्ट द्यायला मला आवडत. मी आता पर्यंत विकत घेतलेली सर्व गिफ्ट मी आता पुण्याला घेऊन जाणार आहे आणि फॅमिली गेट टूगेदर मध्ये सर्वांना देणार आहे.


हेही वाचा – अरुंधतीच्या आयुष्यात येणार जुना मित्र, मालिकेत होणार नव्या पात्राची एंट्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -