Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'आई कुठे काय करते' मधील अनिरुद्धची 'ती' पोस्ट चर्चेत

‘आई कुठे काय करते’ मधील अनिरुद्धची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Subscribe

स्टार प्रवाह वरील मालिका आई कुठे काय करते ही सध्या प्रत्येक घराघरात आवर्जुन पाहिली जाते. यामधील सर्वांच्या भुमिकांमधील नेहमीच चर्चेत राहणारे कॅरेक्टर म्हणजे अनिरुद्ध. याची एक पोस्ट सध्या फार चर्चेत आली आहे. अनिरुद्ध म्हणजेच मिलिंद गवळी याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने वय, वेळ आणि निळू भाऊ यांच्या संदर्भात लिहिले आहे.

मिलिंद याने आपल्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, वेळ कोणासाठी थांबत नाही,आणि असं म्हणतात ही वेळेतच सगळं व्हायला हवं, एकदा का वेळ निघून गेली की मग तुम्हाला काहीही करता येत नाही, आणिदुर्दैव असा आहे की खूप कमी लोकांना वेळेचे महत्त्व आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

- Advertisement -


खूप लोकांना असं वाटतं की आपल्याकडे खूप वेळ आहे. पण खरंतर खूप वेळ हा कोणाकडेच नसतो, प्रत्येकाची वेळ ठरलेली असते. एक कलाकार म्हणून मी ज्यावेळेला माझ्या क्षेत्रातल्या काही लोकांकडे बघतो, आणि मला त्या लोकांचं खूप कौतुक वाटतं त्यांच्याकडे बघून छान वाटतं, आपण पण त्यांच्यासारखं व्हायला हवं किंवा त्यांचे काही गुण आपण घ्यायला हवेत असं सतत वाटत असतं, केरलाचे मोहनलाल यांच्याबरोबर मी काम केलं आहे मला हा कलाकार फार ग्रेसफुली जगतो आहे असं वाटतं, तसंच मी प्राण साहेबांबरोबर काम केलं होतं, ज्या वेळेला त्यांच्याबरोबर सिनेमा केला त्यावेळेला त्यांचं वय होतं 85, या वयात सुद्धा ते फार ग्रेस फुल होते.

मी निळू भाऊ बरोबर ज्या वेळेला काम केलं त्यावेळेला सुद्धा त्यांचं वय होतं 77-78 खूप graceful होते ते, पंडित जसराज यांच्याशी माझे खूप जवळचे संबंध होते , वयाच्या 90 मध्ये सुद्धा ते इतकं सुरेख गायचे, स्वर्गातून परमेश्वर येऊन त्यांचं गायन ऐकत बसत असतील असं वाटायचं .


- Advertisement -

हेही वाचा- मराठी सिनेमांना थिएटर न मिळण्यावर सरकारचा ‘हा’ मोठा निर्णय

- Advertisment -