‘रंग दे बसंती’ सिनेमात काम करण्यासाठी आमिरने हृतिकला केली होती विनंती म्हणाला…

सिनेमात करण सिंघानिया या पात्राची भूमिका साकारणे फार आव्हानात्मक होते

Aamir had requested Hrithik to work in the movie 'Rang De Basanti'.
'रंग दे बसंती' सिनेमात काम करण्यासाठी आमिरने हृतिकला केली होती विनंती म्हणाला...

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी एकापेक्षा एक हिट सिनेमा दिग्दर्शित केले आहे.त्यापैकीच एक महत्वपुर्ण सिनेमा म्हणजेच ‘रंग दे बसंती’ या सिनेमाला रिलीज होऊन तब्बल 15 वर्ष पुर्ण होत आहे. या सिनेमानंतर राकेश ओमप्रकाश मेहरा यांची ओळख बॉलिवूडसह संपुर्ण देशाला झाली. तसेच सिनेमात काम करणाऱ्या कलाकारांनी तर अतुलनिय कामगिरी बजावली आहे. नुकतच राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी त्यांच्या ऑटोबायग्राफी ‘द स्ट्रेंजर इन द मिरर’ (Stranger in the Mirror) मध्ये ‘रंग दे बसंती’ या सिनेमाच्या मेंकिंग दरम्यान त्यांना अनेक अव्हानांचा सामना करावा लागला होता असे पुस्तकात लिहले आहे. याच पुस्तकात त्यांनी अभिनेता आमिर खान आणि हृतिक रोशन यांच्या भेटीचा उलगडा केला आहे.

आमिर खान ऋतिक रोशन यांची भेट-

राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी पुस्तकात लिहलं आहे की, सिनेमात करण सिंघानिया या पात्राची भूमिका साकारणे फार आव्हानात्मक होते. अभिनेत्याची निवड करणे देखील तितकचं कठीण होतं. करणच्या रोलसाठी फरहान अख्तर, अभिषेक बच्चन,हृतिक रोशन यांना ऑफर देण्यात आली होती. पण प्रत्येकाने करणची भूमिका नाकारली. यानंतर मी आमिर खानला या भूमिकेबद्दल हृतिक रोशन सोबत संवाद साधण्यास सांगितले. तसेच आमिर खान हृतिकच्या घरी पोहोचला आणि हृतिकला म्हणाला, ‘हा एक उत्तम सिनेमा आहे तू काम कर.’ पण हृतिकला भूमिका काही खास पंसत पडली नाही. यानंतर दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थला या भूमिकेसाठी निवडण्यात आले. सिद्धार्थने यापुर्वी हिंदी सिनेमात काम केलं नव्हतं तसेच हा सिनेमा 26 जानेवारी 2006 साली रिलीज करण्यात आला होता. व प्रेक्षकांनी याला तुफान प्रतिसाद दिला सिनेमा अल्पवधीतच सुपरहिट ठरला होता.


हे हि वाचा – HBD: तब्बल 14 वर्षांनी ‘दबंग’ सिनेमानंतर बदलले अरबाज खानचे आयुष्य