Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटातील दाढी-पगडीमधील आमिर खान; नवा लूक स्पॉट

‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटातील दाढी-पगडीमधील आमिर खान; नवा लूक स्पॉट

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री करीना कपूर खानच्या बहुचर्चित लाल सिंह चड्ढा या चित्रपटाच्या शुटिंगला मुंबईत जोरदार सुरुवात झाली. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा अभिनेत्री करीना कपूर आणि आमिर खान नवा लूक नुकताच समोर आला आहे. यावेळी दाढी-पगडीमधील आमिर खान खरंच लाल सिंह चड्ढा च्या शैलीत दिसला. आमिर खानचा लाल सिंह चड्ढा मधील लूक अधिकचं भारदस्त वाटतोय. या चित्रपटाच्या शुटिंगसाठी अभिनेत्याने टी-सीरिज कार्यालयात पोहोचला होता. आमिर खानसोबत करीना कपूर खानसुद्धा याठिकाणी स्पॉट करण्यात आले. या चित्रपटात आमिर खानसोबत करीना कपूर खान मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

आमिरने या चित्रपटात शाहरुख खानसाठीही एक स्पेशल रोल देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र तो नेमक्या कोणत्य़ा भूमिकेत दिसेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, शाहरुख व्यतिरिक्त आमिर सलमान खानलाही या सिनेमात घेण्याच्या विचारात आहे.

- Advertisement -

आमिर खानला या सिनेमा निमित्त तिन्ही खान एकत्र दाखवण्याची इच्छा आहे. त्यामुळे शाहरुखप्रमाणे सलमान खानसाठीही आमिरने एक महत्त्वाची भूमिका राखून ठेवली आहे. शाहरुखने त्याच्या ‘लाल सिंह चड्ढा’ सिनेमातील भूमिकेबाबत सांगितलं आहे, मात्र, अद्याप सलमान खानने या चित्रपटात सहभागी होण्यासाठी होकार दिलेला नाही.

गेल्या दोन वर्षापासून लाल सिंह चड्ढा य़ा चित्रपटाच्या चित्रीकरणास मुहूर्त सापडत नव्हता. मात्र नुकतचं या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. त्यामुळे हे चित्रपट पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री करीना कपूर मुलगा जहांगीरच्या जन्मानंतर पहिल्यांदाच सेटवर कमबॅक करणार आहे. अद्वैत चंदन य़ांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.


पैसा, प्रसिद्ध जाताच राणू मंडलची लेकीनेही सोडली साथ


- Advertisement -

 

- Advertisement -