Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन 10 दिवसांच्या मेडिटेशन कोर्ससाठी नेपाळमध्ये पोहोचला आमीर खान

10 दिवसांच्या मेडिटेशन कोर्ससाठी नेपाळमध्ये पोहोचला आमीर खान

Subscribe

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानचा एकेकाळी प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट व्हायचा. मात्र काही वर्षांपासून त्याचे एकानंतर एक असे अनेक चित्रपट फ्लॉप होऊ लागले आहेत. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला त्याचा ‘लाल सिंह चड्ढा’ देखील बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. या चित्रपटाच्या वादामुळे आमीर प्रचंड चर्चेत आला होता. दरम्यान, आता अशातच आमीर मेडिटेशन कोर्ससाठी नेपाळला पोहचला आहे. या ठिकाणी आमीर जवळपास 10 दिवस राहणार आहे.

मेडिटेशन कोर्ससाठी या ठिकाणी राहणार आमीर खान

मिळालेल्या माहितीनुसार, आमीर खान नेपाळमधील काठमांडूच्या बुधानीलकंठा येथील नेपा विपश्यना केंद्रात राहणार आहे. आमीर खान 10 दिवसात त्याचा हा मेडिटेशन कोर्स पूर्ण करेल आणि त्यानंतर तो भारतात परतेल.

आमीर खान ‘गजनी 2’मधून कमबॅक करणार

- Advertisement -

आमीर खान शेवटी ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात आमीरसोबत अभिनेत्री करीना देखील होती. बहिष्काराच्या ट्रेंडमुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. अशातच आता आमीर लवकरच ‘गजनी’ या सुपरहिट चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची तयारी करत आहे. आमीर खान ‘गजनी 2’ मध्ये साऊथचा सुपरस्टार अल्लू अरविंदसोबत दिसणार आहे. मात्र, या चित्रपटाबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. या व्यतिरिक्त आमीर स्नेहा रजनीसोबत एका दमदार नाटकासाठी चर्चा करत आहे. त्याला प्रशांत नीलच्या पॅन इंडिया चित्रपटाची ऑफर ज्युनियर एनटीआर सोबत देण्यात आली आहे.


हेही वाचा :

ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच अक्षय कुमार आणि रवीना टंडन दिसले एकत्र

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -