घरताज्या घडामोडीAmir Khan Birthday : मिस्टर परफेक्शनिस्ट अमीर खान आहे इतक्या संपत्तीचा मालक

Amir Khan Birthday : मिस्टर परफेक्शनिस्ट अमीर खान आहे इतक्या संपत्तीचा मालक

Subscribe

मुंबईत फ्रिडा अपार्टमेंटमध्ये ६५ करोडचे घर आहे. आमिरचे प्रत्येक घर ५ हजार स्क्वेअर फूटचे आहे. इतकेच नाही तर लोणावळ्याच्या पाचगणी येथे आमिरचा १५ करोडचा बंगला आहे. या घराचे त्याने फार्महाऊसमध्ये रुपांतर केले आहे.

यादो की बारात आणि मदहोश सारख्या सिनेमातून बालकलाकार म्हणून अभिनयाला सुरुवात करुन लाखो प्रेक्षकांच्या मनात राज्य करणारा अभिनेता आमीर खान आज त्याचा 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. १९८८मध्ये कयामत से कयामत सिनेमातून मुख्य नायकाची भूमिका साकारुन आमिरने एकसौ एक शानदार सिनेमे बॉलिवूडला दिले. आमिरचा जन्म १४ मार्च १९६५ साली मुंबईत झाला. आमिर आज करोडे रुपयांचा मालक आहे. बंगले, फार्महाऊस, महागड्या गाड्या, जमीन अशी सगळी सुखे आज आमिरकडे आहे परंतु श्रीमंतीचा कोणताही गर्व कधीच आमिरच्या चेहऱ्यावर दिसला नाही. तुम्हाला माहिती आहे का बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट किती करोडच्या संपत्ती मालक आहे ?

सेलिब्रेटी नेटवर्षच्या रिपोर्टनुसार, आमिर खान १८० मिलियन डॉलरचा ( १३५० करोड रुपये ) मालक आहे. आमिरचे वर्षिक उत्पन्न सुमारे १५७ करोड रुपये आहे. म्हणजेच आमिर महिन्याला जवळपास १३ करोड रुपये कमावतो. आमिर सलमान शाहरुख पेक्षा कमी असेल परंतु तो त्याच्या सिनेमाच्या कमाईतील मोठा हिस्सा प्रॉफिट शेअरिंमध्ये असतो. आमिरकडे अमेरिकेच्या बेवर्ली हिल्समध्ये ७५ करोडचा बंगला आहे. त्याचप्रमाणे मुंबईत फ्रिडा अपार्टमेंटमध्ये ६५ करोडचे घर आहे. आमिरचे प्रत्येक घर ५ हजार स्क्वेअर फूटचे आहे.

- Advertisement -

इतकेच नाही तर लोणावळ्याच्या पाचगणी येथे आमिरचा १५ करोडचा बंगला आहे. या घराचे त्याने फार्महाऊसमध्ये रुपांतर केले आहे. २ एकरच्या जमिनीत हे फार्म हाऊस उभारले आहे. आमिरचे फॅमिली एंड फ्रेंड्स अनेकदा इथे सेलिब्रेशनसाठी येत असतात.

आमिर खानच्या युपीतील हरदोई जिल्ह्यातील पुश्तैनी गावात मोठी जमीन आहे. जवळपास १२५ एकर जमीन आमिरच्या नावे आहे. रिपोर्टनुसार, आमिरकडे २२ घरे आहेत. ज्याची किंमत ३० करोड रुपये आहे. आमिर त्याच्या गावच्या घरी लहान असतानाच गेला होता. आता तिथल्या जमिनीची आणि घराची देखभाल त्याचा भाऊ फैजल खान करतो.

- Advertisement -

त्याचप्रमाणे आमिरकडे BMW 7 सिरीज ( 1.2 करोड ) रेंज रोवर ( 1.74 करोड ) बेंटले कॉटिनेंटल फ्लाइंग स्पर (3.10 करोड ) रॉल्स रॉयल कूपे ( बुलेटप्रूफ ) मर्सिडीज बेंज एस 600 ( 10.50 करोड ) सारख्या लग्झरी गाड्या  आहेत.

आमिर खान अनेक जाहिरातीतही काम करत असतो. रिपोर्टनुसार, तो एका जाहिरातीसाठी ४ करोड रुपये मानधन घेतो. २०१८मध्ये आमिरने मोबाईल कंपनी विवो सोबत एक डिल केली होती त्या डिलनुसार, आमिरने विवो कडून १५ करोड रुपये मानधन घेतले होते.


हेही वाचा – The Kashmir Files यशावरी बॉलिवूडच्या मौन पाहू कंगनाचा संताप, म्हणाली ‘यश पाहून सगळे गप्प’

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -