#Metoo मध्ये आमिर खानची उडी; सोडला ‘हा’ चित्रपट

#MeToo मोहिमेला पाठिंबा दर्शवत आमिर खान आणि पत्नी किरण राव यांनी सोशल मीडियावरुन खळबळजनक खुलासा केला आहे.

Aamir Khan decides to step away from his next production in the wake of #MeToo movement
Aamir Khan चा खळबळजनक खुलासा (फाईल फोटो)
बॉलीवूडमध्ये सध्या #MeToo चळवळ जोर पकडत असताना, आता बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अमिर खाननेही या प्रकरणात उडी घेतली आहे. आमिर खानने #MeToo मोहिमेच्या पार्श्वभूमीवर एक महत्वाचा मुद्दा प्रकाशझोतात आणला आहे. ‘लैंगिक छळाचा आरोप लावण्यात लावण्यात आलेल्या ‘त्या’ दिग्दर्शकासोबत काम करण्यास आमिर खानने स्पष्ट नकार दिला आहे. इतकंच नाही तर त्या दिग्दर्शकाचा चित्रपट सोडल्याचंही अामिरने उघड केलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्रींनी #MeToo मोहिमेत उडी घेत, त्यांच्यावर झालेल्या लैंगिक आरोपाबद्दल भाष्य केले आहे. त्यापाठोपाठ आता आमिरखाननेही अशाप्रकारची घोषणा करत #MeToo मोहिमेला पाठिंबा दर्शवला आहे. नेहमीच आपल्या चित्रपटांमधून आणि खासगी आयुष्यातून आमिर खान सामाजिक समस्यांना वाचा फोडत असतो. त्यामुळे आमिरने #MeToo बाबत केलेल्या या वक्तव्याची अधिक चर्चा होत आहे. आमिरने घेतलेल्या या निर्णयाचे त्याच्या चाहत्यांकडून तसंच बॉलीवूड सर्कलमधून कौतक होत आहे.


वाचा: #MeToo चळवळीचा संपूर्ण इतिहास

आमिर खान आणि किरण राव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लैंगिक छळाचा आरोप असलेल्या दिग्दर्शकासोबत काम करण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, लैंगिक छळाचा आरोप लावलेला ‘तो’ दिग्दर्शक कोण तसंच आमिरने सोडलेल्या ‘त्या’ चित्रपटाचं नाव काय याबबत कोणताच खुलासा करण्यात आला नाही. मात्र, बॉलीवूडमध्ये सध्या रंगत असलेल्या चर्चेनुसार तो दिग्दर्शक सुभाष कपूर असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी अधिक चौकशी सुरु असल्याचंही सूत्रांकडून समजत आहे.

यामागील पार्श्वभूमी काय? 

 याप्रकरणी दिग्दर्शक सुभाष कपूर यांचं नाव पुढे येण्यामागेही एक विशेष कारण आहे. मध्यंतरी आमिर खानने ‘मोगुल‘ चित्रपटात काम करणार असल्याचं जाहीर केलं होतं. या चित्रपटांचं दिग्दर्शन सुभाष कपूर करणार होते. सुभाष कपूर यांनी याआधी ‘जॉली एलएलबी’ आणि ‘फंस गए रे ओबामा’ या चित्रपटांचं दिग्दर्शन केले आहे. काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्रई गितीका त्यागी हिने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. गितीकाने लावलेल्या आरोपानंतर लैंगिक शोषण केल्याप्रकरणी सुभाष कपूरवर सध्या केस सुरू आहे. आता अशातच आमिर खानने ‘त्या’ दिग्दर्शकाचा चित्रपट करण्यास नकार दिल्यामुळे, तो दिग्दर्शक सुभाष कपूरच असल्याच्या चर्चा रंगत आहेत.

वाचा: नाना पाटेकरांविरोधात अखेर गुन्हा दाखल