घरमनोरंजनकिरण रावचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाली तर मी डिप्रेशनमध्ये…

किरण रावचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाली तर मी डिप्रेशनमध्ये…

Subscribe

बॉलीवूड स्टार आमिर खान याने दुसरी पत्नी किरण राव हिला घटस्फोट दिला. ऑगस्ट 2021 मध्ये त्यांनी घटस्फोटाची घोषणा केली होती. त्यानंतरही ते दोघे चांगले मित्र आहेत. फॅमिली फंक्शन्समध्ये अनेकदा ते एकत्र दिसले आहेत. आमिर खान आणि त्यांची पहिली पत्नी रिना दत्ता यांची मुलगी इरा खान हिच्या लग्नात अमिर खान आणि किरण राव हे दोघे एकत्र दिसले होते. सध्या किरण राव या आगामी चित्रपट ‘लापता लेडीज’ याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. ‘लापता लेडीज’ची निर्मिती किरण आणि आमिरने संयुक्तपणे केली आहे. याच दरम्यान किरण राव यांनी आमिर खान याच्याबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

अमिर खानच्या प्रॅाडक्शन हाऊससोबत काम करणे नेहमीच सोपे होते. तो नेहमी दुसऱ्यांच्या मतांचे स्वागत करतो. तो माझ्याकडे एक क्रिएटिव्ह पार्टनर म्हणून पाहतो. ही खूप आनंदाची गोष्ट आहे असे किरण हिने सांगितले.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी ‘ॲनिमल’चे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी आमिर खान याच्या चित्रपटावर निशाणा साधला. त्यावेळी किरण राव हिने संदीप रेड्डी वंगा यांना उत्तर दिले. आमिरने त्याच्या काही चित्रपटांसाठी आधीच माफी मागितली आहे. त्यांना आमिरच्या कामाबद्दल काही अडचण असेल तर त्यांनी थेट त्याच्याशी बोलावे. आमिर हा काही एकटा त्याच्या चित्रपटांसाठी जबाबदार नाही असे उत्तर किरण राव यांनी दिले होते.

किरण राव हिने आमिर खान बद्दलही मोठे विधान केलं. ‘मला अनेकदा विचारले जाते, अगदी विमानतळावरही… लोक म्हणतात, ‘तू आमिर खानची पत्नी आहेस ना? आमच्या घटस्फोटाला दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. पण, आजही लोक आमिरची बायको म्हणतात. त्यांना माझे नावही माहीत नसावे? मला याची सवय झाली आहे. पण, मला आमिरची एक्स वाईफ म्हणून ओळखले जाते ते चूकीचे आहे. माझी वेगळी ओळख आहे की नाही” हा प्रश्न मला नेटकऱ्यांना विचारावासा वाटतो.

- Advertisement -

आमिर खानची पत्नी आहेस ना? या प्रश्नामुळे माझी स्वतःची ओळख हरपल्यासारखी दिसते. खरे सांगायचे तर तो मला त्रास देत नाही. कारण, माझ्याकडे माझी स्वतःची आवड आहे. माझे स्वतःचे मित्र, माझे स्वतःचे जीवन आहे. मी या सर्वांसाठी सक्रियपणे काम केले आहे. पण, लग्नानंतर प्रत्येकासाठी स्वतःची जागा आणि ओळख असणे खूप महत्वाचे आहे. मी फक्त एक पत्नी म्हणून ओळखले जात असल्याने नाराज होईल असे त्याला सांगितले तेव्हा तो फक्त हसतो. असे किरण राव म्हणाल्या. स्वत:ची तीव्र जाणीव नसल्यास कोणीही डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो अशी प्रतिक्रियाही तिने दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -