आमिर खान ‘या’ स्पॅनिश चित्रपटाचा हिंदी रिमेक करणार; अशी असेल स्टोरी

aamir khan opened about making remake of spanish film champions on his birthday
आमिर खान 'या' स्पॅनिश चित्रपटाचा हिंदी रिमेक करणार; अशी असेल स्टोरी

बॉलिवूडच्या ज्या अभिनेत्याच्या चित्रपटाची चाहत्यांकडून सर्वाधिक वाट पाहिली जाते तो अभिनेता म्हणजे आमिर खान. प्रत्येक पिढीतील लोकांना मिस्टर परफेक्शनिस्टचे चित्रपट आवडतात. यामुळे गेल्या अनेक दशकांपासून आमिर चित्रपटाच्या आशयाकडे विशेष लक्ष देतो. त्याच्या दंगल, धूम ३ या चित्रपटांनी देशातच नव्हे तर परदेशातही जबरदस्त कमाई केली. त्यामुळे एकाच वेळी अनेक चित्रपट न करता एकच चित्रपट करण्यावर त्याचा विश्वास आहे. आमिरचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहे. यातच आमिरने आगामी चित्रपटाबाबतही सूतोवाच दिला आहे.

आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा चित्रपटाची बऱ्याच काळापासून चर्चा होती. मात्र दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर यावर्षी तो चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यासोबत आमिरच्या आगामी चित्रपटाचीही माहिती समोर आली आहे. खुद्द अभिनेत्याने याला दुजोरा दिला आहे. आमिरचा आगामी चित्रपट हा एका स्पॅनिश चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे. आमिर खानने नुकताच त्याचा 57 वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनदरम्यान त्याने या चित्रपटाच्या रिमेकबाबत माहिती दिली आहे. सध्या या चित्रपटाचे प्लॅनिंग सुरु असून याबाबत तुम्हाला लवकरचं अपडेट करू. आमिर खान 2018 मध्ये रिलीज झालेल्या स्पॅनिश चित्रपट कॅम्पिओन्स च्या रिमेकवर काम करण्याच्या तयारीत आहे.

आमिर खान ज्या स्पॅनिश चित्रपटाचा रिमेक बनवणार आहे त्याची कथा एका बास्केटबॉल प्रशिक्षकाभोवती फिरते. बास्केटबॉल प्रशिक्षक समाजसेवेसाठी मानसिकदृष्ट्या आजारी खेळाडूंचा संघ कसा तयार करतो हे दाखवले आहे. हा एक विनोदी चित्रपट आहे ज्यात जेव्हियर गुटिएरेझ, इत्झियार कॅस्ट्रो, लुईसा गावासा, डॅनियल फ्रेरे, जुआन मार्गालो, अथेनिया माटा, रॉबर्टो चिंचिला, जीसस विडाल, स्टेफेन लोपेझ, फ्रॅन फ्युएन्टेस यांचा समावेश आहे.

अशातच आमिरचे चाहते त्याला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. त्याचा ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहे जो 11 ऑगस्ट रोजी मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत करीना कपूर, मोना सिंग आणि नागा चैतन्य मुख्य भूमिकेत असणार आहेत.


सलमान खानने ईदपूर्वीच आऊट केला अजय देवगवच्या ‘Runway 34’ चा टीझर