घरताज्या घडामोडीVideo: आमीरच्या 'पाणी फाउंडेशन'ने साताऱ्यातील गावात नापीक जमिनीचं केलं नंदनवन

Video: आमीरच्या ‘पाणी फाउंडेशन’ने साताऱ्यातील गावात नापीक जमिनीचं केलं नंदनवन

Subscribe

बॉलिवूड अभिनेता आमीर खानने नुकताच इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत आमीर खानने आपल्या ‘पाणी फाउंडेशन’च्या माध्यमातून केलेल्या कामाबद्दल आपला आनंद व्यक्त केला आहे. सप्टेंबर २०१८ पासून आमीर खानच्या ‘पाणी फाउंडेशन’ने थोर जपानी पर्यावरण शास्त्रज्ञ अकिरा मियावाकीकडून प्रेरित होऊन सायट्रिस पर्यावरण ट्रस्टसोबत या प्रवासाला सुरुवात केली होती. त्याच अंतर्गत एका नापीक जमिनीचे जंगलात रुपांतर झाल्याचे पाहायला मिळाले. सप्टेंबर २०२० मध्ये दोन वर्षानंतर या प्रकल्प यशस्वीपूर्ण केला गेला आहे.

आमीरच्या ‘पाणी फाउंडेशन’ने सातारा जिल्ह्यातील न्हावी बुद्रुक गावात ग्रामस्थांच्या मदतीने २ हजार झाडे लावली होती. नापीक जमिनीचे जंगलात रुपांतर करण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करीत इथे वृक्षारोपण करण्यात आले होते. आता अभिमान वाटावा असा याचा परिणाम खूपचं चांगला झाला. आता ही नापीक जमिनीचे घनदाट जंगलात रुपांतर झाले असून प्राण्यांसाठी देखील हक्काचे निवासस्थान निर्माण झाले आहे.

- Advertisement -

आमीरने या व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, ‘आमीर खान, किरण राव आणि संपूर्ण ‘पाणी फाउंडेशन’ची टीम गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र आणि आसपासच्या जलसंधारणाच्या कामात सहभागी आहे. फाउंडेशनच्या अविश्वसनीय वेळ आणि प्रयत्नांमुळे माणसं, झाडं आणि प्राणी एकसंधरित्या बदलण्यासाठी सक्षम बनवले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे, आज नापीक जमिनीवर हिरवेगार जंगलं उभे राहिले आहे.’

View this post on Instagram

Please watch and give me your reactions. Love. a.

A post shared by Aamir Khan (@_aamirkhan) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -