घरमनोरंजनआमीर खान, आर माधवन आणि शरमनला एकत्र पाहून चाहत्यांनी केली 'थ्री...

आमीर खान, आर माधवन आणि शरमनला एकत्र पाहून चाहत्यांनी केली ‘थ्री इडियट्स 2’ बनवण्याची मागणी

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शरमन जोशी सध्या त्याच्या एका गुजराती चित्रपटामुळे चर्चेत आहे. याचं चित्रपटाचं प्रमोशन शरमनने आमीर खान आणि आर माधवनसोबत देखील केलं आहे. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ‘थ्री इडियट्स’मधील राजू, रँचो आणि फरहानला खूप वर्षांनंतर एकत्र पाहिल्यानंतर चाहते खूप खूश झाले असून ‘थ्री इडियट्स’चा पुढचा पार्ट बनवण्याची मागणी करु लागले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sharman Joshi (@sharmanjoshi)

अभिनेता शरमन जोशीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो त्याच्या गुजराती ‘काँग्रॅच्युलेशन’ या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. इतक्यात त्या व्हिडीओमध्ये आर माधवनची एन्ट्री होते. शरमन त्याला चित्रपटाबद्दल सांगतो इतक्यात आमीर खानची व्हिडीओमध्ये एन्ट्री होते. शरमन त्या दोघांनाही या चित्रपटाबद्दल सांगतो. सध्या त्यांच्या हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिघांनीही क्रिकेटर्स प्रमाणे एकाच रंगाचे कपडे परिधान केले आहेत. या व्हिडीओ खाली शरमनने लिहिलंय की, “‘थ्री इडियट्स’ ‘काँग्रॅच्युलेशन’चं प्रमोशन करत आहे. जो आज प्रदर्शित होणार आहे.”

- Advertisement -

चाहत्यांनी केली ‘थ्री इडियट्स’ बनवण्याची मागणी
आमीर खान, आर माधवन आणि शरमन जोशीला अनेक वर्षांनंतर एकत्र पाहिल्यावर ‘थ्री इडियट्स’ चा दुसरा बनतोय अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, आता चाहते देखील ‘थ्री इडियट्स’चा पुढचा पार्ट बनवण्याची मागणी करु लागले आहेत. 2009 मध्ये ‘थ्री इडियट्स’ प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर देखील सुपरहिट झाला होता.

 

- Advertisement -

हेही वाचा :

नागिन मालिकेतील अभिनेत्री उर्वशी ढोलकियाच्या गाडीचा अपघात

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -