आमिर खान फिल्म इंडस्ट्री सोडण्याच्या होता विचारात; पण पत्नी आणि मुलीसाठी बदलला निर्णय

Aamir Khan says he was ready to quit acting ex-wife Kiran Rao daughter Ira changed his mind
आमिर खान इंडस्ट्री फिल्म सोडण्याच्या होता विचारात; पण पत्नी आणि मुलीसाठी बदलला निर्णय

आमिर खान हा हिंदी सिनेसृष्टीतील एक आघाडीचा अभिनेता आहे. त्याच्यासोबत काम करण्याची अनेक कलाकारांना उत्सुकता असते. सुपरस्टार अभिनेता आमिर खानला आज बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्टनिस्ट म्हणून ओळखले जाते. आमिर खानची खासियत म्हणजे तो वर्षाला काहीच मोजकेच चित्रपट करतो पण ते चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करून जातात. अलीकडेच त्याने सोशल मीडियापासून दूर राहणे पसंत केले आहे. पण अनेक कारणांमुळे तो चाहत्यांच्या संपर्कात असतो. परंतु सोशल मीडियाप्रमाणे त्याने अलीकडेच बॉलिवूडपासून देखील दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. आमिर खानचा हा निर्णय आता चाहत्यांसाठी एक आश्चर्याची गोष्ट ठरत आहे.

आमिर खानने नुकतीच एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या आयडियाज ऑफ इंडिया कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी बोलताना आमिर म्हणाला की, “मला वाटते मी आयुष्यात माझ्या स्वप्नांचा पाठलाग करण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण या प्रवासादरम्यान मी माझ्या प्रियजनांना वेळ देऊ शकलो नाही. माझे पालक, माझी भावंड, माझी मुलं, माझी पहिली पत्नी रीना, माझी दुसरी पत्नी किरण, त्यांचे आई-वडील… कदाचित मी त्यांना पुरेसा वेळ देऊ शकलो नाही. यामुळे कोरोना काळात मी आयुष्याबद्दल विचार करत असताना इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता,

आमिर खानने बॉलिवूड इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय का घेतला? यावर तो म्हणाला की, कोरोना काळात मला एकांतात आयुष्याबद्दल विचार करण्याची संधी मिळाली. यावेळी माझ्या लक्षात आले की, स्वत:साठी जगताना मी माझ्या जवळच्या लोकांना वेळ देऊ शकलो नाही. माझी मुलगी आता 23 वर्षाची आहे. तिच्या आयुष्यात अनेकदा माझी उपस्थिती चुकली असेल याची मला खाली आहे. ती लहाना होती, तिला स्वत:ची स्वप्ने, आशा आणि चिंता असतील, पण तिच्यासाठी मी नेहमी उपस्थित नव्हतो. मी प्रेक्षकांसोबत मी हसलो, रडलो पण माझ्या मुलांसोबत मत्र वेळ घालवू शकलो नाही.

आमिर पुढे म्हणाला की, माझ्या मुलांना काय हवंय हे मला माहिती नाही आणि ही एक मोठी समस्या आहे. जेव्हा मला माझी चूक कळली तेव्हा मला स्वत:चा आणि सिनेमाचाही खूप राग आला. सिनेमाने मला माझ्या कुटुंबापासून तोडलं असा मला वाटू लागले. त्यामुळे मी अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला. मी माझ्या कुटुंबियांनाही सांगितले की, मी यापुढे कोणताही चित्रपट, अभिनय, निर्मिती करणार नाही. पण तेव्हा मी अभिनय सोडला असे लोकांना सांगितले असते तर त्याचा वेगळा अर्थ काढला असता. लोक ही लाल सिंग चड्ढा चित्रपटासाठीची ही एक मार्केटिंग किंवा नौटंकी असल्याचे समजले असते, त्यामुळे मी गप्प बसण्याचा निर्णय घेतला, तसेच कोणत्याही माध्यमाद्वारे लोकांना काही सांगितले नाही.

मात्र इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय जेव्हा पूर्व पत्नी किरण राव आणि मुलं इरा आणि आझादला सांगितला तेव्हा त्यांनी मला समजावलं की, तू इतरांपेक्षा वेगळा माणूस आहेस, त्यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात तू संतुलन राख. यासाठी किरणने खूप मदत केली, तिला माझा निर्णय ऐकून रडू कोसळले. किरणने सांगितले की, मला सिनेमाची आवड आहे त्यामुळे सिनेमाशिवाय ती माझी कल्पनाही करू शकत नव्हती, त्यामुळे माझ्या निर्णयाला तिचा विरोध होता.

आमिर पुढे अजून सांगतो की, मुलं म्हणाली, गेल्या 30 वर्षांत तू आम्हाला एवढा वेळ दिला नाहीस जेवढा 3 महिन्यांत दिला आहेस. आता तू तुझं काम पुन्हा सुरू कर. परफेक्टनिस्ट लेबलवर आमिर म्हणतो की, मी परफेक्टनिस्ट नाही. परफेक्टनिस्ट हे लेबल माझ्यासाठी अयोग्य आहे. पण एकदा लेबल चिकटलं की, ते आयुष्यभर तसचं राहतं. माझं फक्त माझ्या कामावर प्रेम आहे.

आमिर खानच्या वर्कफ्रंडबद्दल सांगायचे झाल्यास लवकरचं त्याचा लाल सिंग चड्ढा सिनेमा रिलीज होणार आहे. या चित्रपटाक करीना कपूर खान, मोना सिंग आणि नागा चैतन्य मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सिक्रेट सुपरस्टार फेम अद्वैत चंदन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.


Yo Yo Honey singh चे जबरदस्त ‘बॉडी ट्रान्सफॉर्मेशन’; चाहते म्हणाले, ‘किंग इज बॅक’