घरमनोरंजनआमिर खानची बहिण 'या' चित्रपटात करणार अभिनय

आमिर खानची बहिण ‘या’ चित्रपटात करणार अभिनय

Subscribe

आमिर खानची बहीण पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची निर्मिती असेलेला ‘सांड की आंख’चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. जगातील सर्वांत वृद्ध महिला शार्पशूटर्सच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. पण या चित्रपटा बद्दल आणखी एक गोष्ट समोर आली आहे. आमिर खानची बहीण पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

शूटर आजीच्या पात्राबरोबर आणखी एक पात्र चित्रपटात महत्त्वाचं आहे. ही भुमिका आमिर खानची बहीण निखत खान यांनी साकारली आहे. निखत एका महाराणीच्या भूमिकेत दिसणार आहेत.
मात्र तिच्या भूमिकेविषयी अद्याप सविस्तर खुलासा करण्यात आलेला नाही.चित्रपटात तापसी आणि भूमीसह प्रकाश झा आणि विनीत सिंहदेखील प्रमुख भूमिकेत आहेत.

 

View this post on Instagram

 

Wishing everyone a very Happy Raksha Bandhan. Love a.

A post shared by Aamir Khan (@_aamirkhan) on

- Advertisement -

या चित्रपटात त्या पहिल्यांदा अभिनय करणार आहेत. या आधी त्यांनी निर्माती म्हणून काम केलं आहे. ९०च्या दशकात ‘तुम मेरे हो’ चित्रपटाची निर्मिती तिने केली होती. यात निखतने आपल्या वडिलांसह सह-निर्माता म्हणून काम केलं होतं. त्यानंतर २००२ मध्ये ‘हम किसी से कम नही’ चित्रपटासाठी निखतने कॉस्टयूम अस्सिटन्ट म्हणून काम केलं होतं.

 ‘सांड की आंख’ या चित्रपटात दोन्ही अभिनेत्री वृद्ध शुटर्स महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या चेहऱ्यावरील वृद्धत्व दिसावे याकरिता उत्तम मेकअप टेक्निकचा वापर करण्यात आला आहे. हा चित्रपट दिवाळीमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.‘सांड की आँख’ हा चित्रपटाची निर्मीती निधी परमार आणि अनुराग कश्यम करत आहेत. तर चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार हिरानंदानी करत आहेत. चित्रपटात अनुराग कश्यप आणि भूमी पेडणेकर यांच्याबरोबर प्रकाश झा आणि विनीत सिंग महत्त्वाच्या भुमिकेत आहेत. त्याचप्रमाणे आणखी कोण कोण या चित्रपटात असणार ही नावं ही लवकरच कळतील. चित्रपटाचे चित्रीकरण सध्या दिल्ली जवळच्या एका गावात सुरू आहे. चित्रपटाची कथा काय असणार आहे हे सध्या गुलदस्त्यात आहे.

 

View this post on Instagram

 

They challenged their age, fought their way and shot to fame in the shooting game. First Look Out Now. #SaandKiAankhThisDiwali

A post shared by Taapsee Pannu (@taapsee) on

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -