घरमनोरंजनघटस्फोटावर आमिर खानचं मोठं विधान; म्हणाला, 'माझ्या मनात अजूनही...'

घटस्फोटावर आमिर खानचं मोठं विधान; म्हणाला, ‘माझ्या मनात अजूनही…’

Subscribe

बॉलिवूडमध्ये  एक आघाडीचा अभिनेता म्हणूनआमिर खानला ओळखले जाते. 90 च्या दशकापासून ते आजपर्यंत त्याने विविध चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. त्यामुळे चाहते आजही अभिनेत्याच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात. आमिरच्या अभिनयानेच नाही तर त्याच्या चित्रपटाच्या आशयाने देखील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आमिर खानची खासियत म्हणजे तो वर्षाला काहीच मोजकेच चित्रपट करतो पण ते चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करून जातात. अलीकडेच त्याने सोशल मीडियापासून दूर राहण्याचा मोठा निर्णय घेतला. बॉलिवूडमध्ये आज त्याची परमिस्टर परफेक्टनिस्ट म्हणून ओळख आहे. सध्या सोशल मीडियावर आमिर खानची एक मुलाखत व्हायरल होत आहे. या मुलाखतीत त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्यापासून ते व्यावसायिक आयुष्यावर भाष्य केलं आहे. दरम्यान घटस्फोटावर देखील त्याने मोठं विधान केलं आहे.

आमिर खान घटस्फोटाबाबत बोलताना म्हणाला की, माझ्या आयुष्यात आजही रीना जींबाबत आदर आणि प्रेम आहे. आम्ही एकत्र लहानचे मोठे झालो. किरण जींबद्दल सांगायचे तर आमची एकमेकांवर नाराजी नाही, भांडण नाही, फक्त आमच्या नात्यात थोडे बदल झाले आहेत. दरम्यान आमिर खान आणि किरण रावच्या घटस्फोटानंतर बी-टाऊनमध्ये अनेक चर्चांना उधाण आले. अनेक उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या. दरम्यान आमिरचे नाव एका अभिनेत्रीसोबत जोडले गेले. मात्र आमिर आणि किरण राव यांच्या घटस्फोटामागचे नेमके कारण काय हे अद्याप समोर आलेले नाही.

- Advertisement -

आमिर खानचा लाल सिंग चड्ढा हा सिनेमा 11 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात करीना कपूर खान, मोना सिंग आणि नागा चैतन्य मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सिक्रेट सुपरस्टार फेम अद्वैत चंदन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यादिवशी बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारचा रक्षाबंधन हा सिनेमा देखील प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर मिस्टर परफेक्टनिस्ट आणि खिलाडी अशी काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.


Oscars 2022 ला भारताच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि दिलीप कुमार यांचा विसर; भारतीय चाहत्यांचा संताप


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -