Aamir Khan Third Wedding: सहाय्यक अभिनेत्रीसोबत आमिर खान बांधणार तिसऱ्यांदा लग्नगाठ!

Aamir Khan To Announce His Third Marriage With A Co-Star Post Laal Singh Chaddha
Aamir Khan Third Wedding: सहाय्यक अभिनेत्रीसोबत आमिर खान बांधणार तिसऱ्यांदा लग्नगाठ!

बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानने (Aamir Khan) ऑगस्टमध्ये घटस्फोट घेतल्याचे जाहीर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. आता पुन्हा एकदा आमिर खान आपल्या चाहत्यांना सरप्राईज देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दुसरी पत्नी किरण रावसोबत घटस्फोट घेतल्यानंतर आमिर खान तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधणार असल्याचे समोर आहे. माहितीनुसार, लवकरच आमिर खान तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे. पण आमिर खान तिसऱ्यांदा लग्न करण्याचा प्लॅन कोणासोबत करत आहे, हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. मात्र काही वृत्तांनुसार आमिर खान आपल्या सहाय्यक अभिनेत्रीसोबत लग्नाचा प्लॅन करत आहे. त्यामुळे आमिर खानची तिसरी पत्नी कोण असणार आहे? या अभिनेत्री नाव काय आहे? हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सकुता वाढली आहे.

गेल्या काही दिवसांपासून आमिर खान ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. आमिर खान या चित्रपटात करीना कपूरसोबत दिसणार आहे. पण यादरम्यान आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आता चित्रपटासोबतच आमिरच्या तिसऱ्या लग्नाबाबतच्या घोषणेचीही सर्वांना प्रतीक्षा आहे. माहितीनुसार आमिर ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तिसऱ्या लग्नाबाबत जाहीर करण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. कारण सर्वांचा फोकस चित्रपटावरून आमिरच्या तिसऱ्या लग्नावर होईल आणि यामुळे चित्रपटाचे मोठे नुकसान होईल. यामुळे आमिरला चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी कोणत्याही प्रकारच्या वादात सापडायचे नाही आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर तिसऱ्या लग्नाबाबत आमिर जाहीर करण्याची शक्यता आहे.

ज्या सहाय्यक अभिनेत्रीसोबत आमिर खान लग्न करणार आहे, तिला त्याच्या दुसऱ्या घटस्फोटाबाबत माहित आहे. दरम्यान आमिर खानचे घटस्फोटानंतरही दोन्ही पत्नी रीना दत्ता आणि किरण रावसोबत चांगले संबंध आहेत. तो सतत रीना आणि किरणला भेटतही असतो. आमिर आणि रीना दत्तला दोन मुलं आहेत, जुनैद आणि इरा. तर आमिर आणि किरणला एक मुलगा आहे, ज्याचे नाव आझाद आहे. या सर्व मुलांमध्येही चांगले संबंध आहेत.


हेही वाचा – ‘बिग बीं’ कडून पान मसाला कंपनीला कायदेशीर नोटीस