घर मनोरंजन Aamir Khan : आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा ?

Aamir Khan : आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा ?

Subscribe

आमिरखान सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. ज्याचे कारण आगामी चित्रपट नसून त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित आहे. अलीकडेच मिस्टर परफेक्शनिस्ट दंगलमध्ये मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री फातिमा सना शेखसोबत दिसला होता. त्याचवेळी दोघांना एकत्र पाहिल्यानंतर अभिनेत्याच्या अफवांची चर्चा पाहायला मिळाली.

दरम्यान, दोघांना एकत्र पाहिल्यानंतर सोशल मीडियावर अभिनेत्याच्या डेटिंगच्या अफवांना वेग आला आणि चाहते आपल्या प्रतिक्रिया देताना दिसले. दरम्यान, आता या प्रकरणात बॉलिवूड अभिनेता केआरकेने एक नवा दावा केला आहे की, आमिर खान त्याची को-स्टार अभिनेत्री फातिमा सनासोबत लग्न करणार आहे, जे त्याचे तिसरे लग्न असेल.

- Advertisement -

Fatima Sana Shaikh Finally Speaks on Her Link-up Rumours With Aamir ...

अशातच वायआरएफच्या ठग्स ऑफ हिंदोस्तानमध्ये दोघांनी एकत्र काम केल्यापासून आमिर खान आणि फातिमा सना ही जोडी चाहत्यांच्या नजरेत होती. त्याचवेळी या दोघांना डेट केल्याच्या चर्चा ही रंगल्या होत्या. दरम्यान, या दोन्ही स्टार्सचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यात ते पिकलबॉल गेम खेळताना दिसत होते.

- Advertisement -

यानंतर या दोन्ही स्टार्सचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यात ते पिकलबॉल गेम खेळताना दिसत होते. तर चाहत्यांनीही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण आता केआरकेने ट्विट करून दावा केला आहे. ‘आमिर खान लवकरच आपल्या मुलीच्या वयाच्या फातिमा सना शेखसोबत लग्न करणार आहे.

From baap to bae: How Aamir Khan and Fatima Sana Shaikh's relationship ...

आमिर खान #दंगल या चित्रपटाच्या काळापासून सनाला डेट करत आहे. हे ट्विट पाहून लोकांनीही प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे आणि अभिनेत्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. आता यावर चाहत्यांना प्रश्न पडला आहे की,हे आमिर खान खरंच लग्न करणार आहे की ही फक्त अफवा आहे.


हेही वाचा : 

सावरकरांच्या भूमिकेसाठी एक ग्लास दूध पिऊन रणदीपने केलं 26 किलो वजन कमी

- Advertisment -