वाढत्या वजनामुळे आमिरची लेक ईरा चिंतेत; 15 दिवस उपवास करत वजन घटवण्याचा प्रयत्न

अलीकडे ईराने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत सांगितले की, मी माझे वजन कमी करण्यासाठी सुरुवातीला 15 दिवस उपवास केला.

Aamir Khans daughter Ira Khan fasted for 15 days to start losing 20kgs Its been really messing with my head
वाढत्या वजनामुळे आमिरची लेक आयरा चिंतेत; 15 दिवस उपवास करत वजन घटवण्याचा प्रयत्न

ईरा खान ही बॉलिवूड स्टारकिड्सपैकी एक असून जिची सर्वाधिक चर्चा असते. बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानची ईरा खान ही लेक आहे. मात्र आयर सध्या तिच्या वाढत्या वजनामुळे त्रस्त झालीय. सतत वाढणाऱ्या वजनामुळे ईराला अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. याचा खुलासा तिने स्वत: एका सोशल मीडिया पोस्टमधून केलाय.

अलीकडेच ईराने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत सांगितले की, मी माझे वजन कमी करण्यासाठी सुरुवातीला 15 दिवस उपवास केला. मी माझ्या सेल्फ मोटिव्हेशन आणि सेल्फ इमेजसोबत काही चांगल्या प्रकारे वागत नाही. मागील चार ते पाच वर्षांचा अपवाद वगळता मी माझ्या संपूर्ण आयुष्यात खूप सक्रिय आहे. या पाच वर्षात माझं वजनं 20 किलोने वाढले आणि त्याचा मला त्रास होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)


ईरा पुढे सांगते की, “माझं वजन जास्त असून ते कमी झालेलं नाही. यातून मला अजून प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळाली. मी आता हे रुटीन कायम ठेवण्यासाठी माझ्याकडून जे काही करता येईल ते करत आहे. काळजीपूर्वक विचार केल्यावर मी सेल्फ मोटिवेशनमधून काही चांगल्या गोष्टी शिकल्या आहेत. ज्या शेअर करण्यास मी खूप उत्सुक आहे. यातील काही गोष्टी अशा आहेत की, ज्या मला स्वतःपासून सुरु कराव्या लागतील. मी लवकरच त्या शेअर करेन. हे पाहण्यासाठी मला खूप उत्सुकता आहे की सर्वजण कुठे जात आहेत. नवीन वर्षाच्या शुभेच्छा.”

ईरा ख्रिसमसनिमित्त तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिकरेसोबत जर्मनीत होती. तिने नुपूरसोबतचे काही फोटो शेअर केले होते. यातील एका फोटोमध्ये ईरा मिठाईसोबत पोज देताना दिसतेय. या तिने लिहिले की, “खाऊ शकत नाही पण याचा अर्थ असा नाही की मी त्याच्यासोबत पोज देऊ शकत नाही!”

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

‘बजरंगी भाईजान’ची ‘मुन्नी’ ठरली खास अवॉर्डची मानकरी, इंटरनेटवर फोटो व्हायरल