अमिरच्या आईचा कोरोना रिपोर्ट आला, ट्विटकरून दिली माहिती

Aamir Khan Speaks Up On His Divorce From Kiran Rao And Reena Dutta
घटस्फोटावर आमिर खानचं मोठं विधान; म्हणाला, 'माझ्या मनात अजूनही...'

कोरोनाने बॉलिवूडकरांच्या घरात प्रवेश केला आहे. बोनी कपूर, नंतर आता अमिर खानच्या काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आले होते. अमिरने ट्विटरद्वारे ही माहिती दिली होती. त्यानंतर त्याने आईची कोरोनाची चाचणी करून घेतली. अखेर आज अमिरच्या आईचा कोरोना चाचणीचा अहवाल आला आहे. अमिरने पुन्हा एकदा ट्विटरवरून याची माहिती दिली आहे.

 अमिरने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की माझ्या आईची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार’ .

याआधी आमिरने फेसबुकवर पोस्ट करत काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले होते. माझ्या कर्मचाऱ्यांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळे त्यांना तातडीने क्वारंटाइन करण्यात आले असून महानगरपालिकेकडून योग्य ती उपचाराची काळजी घेतली जात आहे. कोरोना बाधितांची योग्य ती काळजी घेतल्याबद्दल मी मुंबई महानगर पालिकेचे आभार मानतो. तसेच माझी आणि उलेल्या कर्मचाऱ्यांची करोना चाचणी करण्यात आली. ती निगेटीव्ह आली. आता मी माझ्या आईला करोना चाचणी करण्यासाठी घेऊन जात आहे. असे अमिरने पोस्टमध्ये म्हटले होते.


हे ही वाचा – सावधान! चीन आणि पाकिस्तान एकाचवेळी भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत!