HomeमनोरंजनAaradhya Bachchan : बिग बींच्या 13 वर्षीय नातीची हायकोर्टात धाव, प्रकरण काय?

Aaradhya Bachchan : बिग बींच्या 13 वर्षीय नातीची हायकोर्टात धाव, प्रकरण काय?

Subscribe

बॉलीवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांची नात आराध्या बच्चन कायम तिच्या संस्कारी वर्तनामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. मात्र, आज आराध्याची चर्चा काही वेगळ्याच कारणामुळे आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन स्टारकिड्सपैकी एक आहे. त्यामुळे आराध्या आई वडिलांसोबत एखाद्या ठिकाणी स्पॉट झाली तर लाइमलाईटमध्ये येतेच. पण आज आराध्याने हाय कोर्टात धाव घेतल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. हे नेमकं प्रकरण काय आहे? 13 वर्षीय मुलीला हायकोर्टात का जावे लागले? याविषयी सविस्तर जाणून घेऊया. (Aaradhya Bachchan filed petition in Delhi High Court on misleading content)

.. म्हणून हायकोर्टात गेली आराध्या

अमिताभ बच्चन यांची नात आराध्या बच्चनने एप्रिल 2023 मध्ये वडिलांच्या (अभिषेक बच्चन) मदतीने न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. ज्यात तिने गूगल, यूट्यूब आणि अन्य डिजिटल वेबसाईट्सवर तिच्या आरोग्याबाबत चुकीची माहिती देण्यात आल्याचे म्हटले होते. तिच्या याचिकेवर विचार करून न्यायालयाने यूट्यूबला आराध्याच्या आरोग्याविषयी चुकीची माहिती देणारे व्हिडीओ लगेच हटवण्याचे आदेश दिले होते. तसेच गूगलवरून तिच्याबाबत दिलेल्या माहितीत आरोग्याविषयी लिहिलेला मजकूर काढून टाकण्यास सांगितले.

या सुनावणीवेळी न्यायमूर्ती सी. हरी शंकर म्हणाले होते, ‘एका अल्पवयीन मुलीबद्दल अशा प्रकारची माहिती पसरवणे हे कायद्याचे उल्लंघन आहे. त्यामुळे त्वरित ही माहिती काढून टाकावी आणि भविष्यात असा प्रकार घडणार नाही याची पूर्ण काळजी घ्यावी. तसेच केंद्र सरकारने अशी माहिती ब्लॉक करावी आणि गूगलने नियमांचे पालन करावे’. या सुनावणीनंतरही युट्युबवर अद्याप काही व्हिडीओ तसेच गुगलवर खोटी माहिती दिसून येत असल्याचा दावा करत आराध्याने थेट हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

आराध्याला गंभीर आजार?

आराध्या बच्चनने दाखल केलेल्या याचिकेत म्हटलंय, ‘मला एक अत्यंत गंभीर आजार आहे अशी माहिती पसरवली जातेय. या माहितीतून लोकांची दिशाभूल केली जात आहे. ही माहिती खोटी आहे. तसेच काही वेबसाईटने माझ्या निधनाची बातमी दिली आहे. कोणत्याही पडताळणीशिवाय दिलेली ही माहिती नाहक मनस्ताप देणारी आहे’.

पुढच्या सुनावणीची तारीख

आराध्या बच्चनने तिच्या आरोग्याविषयी खोटी माहिती पसरवण्याबाबत दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी युट्युब, गूगलसोबत अन्य काही वेबसाइट्सना नोटीस पाठवण्यात आली. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या 17 मार्च 2025 रोजी होणार आहे. सोशल मीडियावर आराध्या तिच्या संस्कारी वर्तन आणि स्मितहास्यासाठी कायम चर्चेत असते. स्टारकिड म्हणून आराध्याला फॉलो करणाऱ्यांची संख्या बरीच मोठी आहे. परिणामी, तिच्याविषयी अशी माहिती पसरल्यामूळे अनेकदा चाहते चिंतेत पडतात. मात्र, ही माहिती खोटी असल्याचे समजल्यापासून सोशल मीडियावर चाहत्यांनीदेखील त्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

हेही पहा –

World Cancer Day 2025 : या सेलिब्रिटींनी केलीय कॅन्सरवर मात