आरोह वेलणकरचा संजय राऊत यांना टोला, म्हणाला राऊत अजून…

आरोह वेलणकरने आपल्या ट्वीटर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने लिहिलंय की

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. अखेर शिंदेगट आणि भाजप एकत्र आल्यानंतर गुरूवारी ३० जून रोजी एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्री पदासाठी घोषणा झाली, त्यानंतर सोमवारी शिंदे आणि भाजप गटाने आपलं बहुमत सिद्ध करत विश्वादर्शक ठराव जिंकला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली. या सर्व प्रकरणानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी विधानसभेतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विधानाची खिल्ली उडवली. ज्यावरून आता अभिनेता आरोह वेलणकरने एक पोस्ट शेअर करत संजय राऊत यांना टोला लगावलेला आहे.

अलीकडे अभिनेता आरोह वेलणकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो वारंवार राजकीय हालचालींबाबत आपलं मत व्यक्त करत असतो. दरम्यान आता सुद्धा आरोह वेलणकरने आपल्या ट्वीटर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने लिहिलंय की, “संजय राऊत यांची कॉमेंट्री अजूनही थांबतच नाहीये.” या पोस्टवर युजर्स अनेक कमेंट देखील करत आहेत.

दरम्यान, आरोह वेलणकर या पूर्वी ‘लाडाची लेक गं’ या मालिकेत दिसला होता, तसेच तो ‘बिग बॉस मराठी 2’ मध्ये देखील सहभागी झाला होता. याशिवाय त्याने ‘रेगे’ चित्रपटातून आपल्या मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं.


हेही वाचा : रणवीर सिंह साकारणार ‘शक्तिमान’ची भूमिका