Aarya 2: राम माधवानी सांगतायत कसा असेल आर्य २

Ram Madhvani share Experience of arya 2 shooting
Aarya 2: राम माधवानी सांगतायत कसा असेल आर्य २

सर्वोत्कृष्ट ड्रामा सीरिजसाठी आंतरराष्ट्रीय एमी नामांकन मिळविणारा सर्वात मनोरंजक थ्रिलर बनल्यानंतर, आर्या त्याच्या सीझन २ सह डिजिटल स्क्रीनवर परतत आहे. ट्रेलरमधील अनेक मनोरंजक ट्विस्ट्समुळे या सीरिजच्या दुसऱ्या भागाविषयी सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

आर्याचा दुसरा भाग रिलीज होण्याआधी, राम माधवानी आपल्यासोबत दोन्ही सीझनचे खास घटक शेअर करत आहेत. ते म्हणतात, “आर्या १ आणि आर्या २ मधील सिग्नेचर एलिमेंट म्हणजे नैतिक निवड आणि आर्या सामना करत असलेला नैतिक संघर्ष. पहिल्या भागात, तिला आपल्या मुलांचे संरक्षण करायाचे होते. तिने तिच्या वडिलांना तुरुंगात पाठवले आणि मुलगी किंवा बायको पेक्षाही तिने ‘आई’ हा पर्याय निवडला. हा तिचा मोठा संघर्ष होता. सीझन२ मध्ये, पुन्हा नैतिक संघर्ष आहे. ट्रेलरमध्ये ती परत आल्याचे दिसत आहे. आता ती इथून पुन्हा निघून जाणार आहे का, तिचे पुढे काय होणार आहे, आता ती कशाची निवड करणार आहे यामध्ये नैतिक संघर्ष आहे आणि त्यामुळे नाट्य आणि तणाव निर्माण होतो. दुसऱ्या भागामध्ये हे महत्त्वाचे आहे.”

फॉर्मबाबत बोलायचे झाल्यास, आम्ही सर्व काही ३६० मध्ये शूट केले आहे. मला तीन ते चार कॅमेरे वापरायला आवडत नाहीत. मी सर्व कलाकारांसोबत सहज होतो. मला वाटते की सर्व कलाकारांना त्यांच्या व्यक्तिरेखा माहित होत्या, ही महत्त्वाची गोष्ट आहे. मी म्हणेन की हा एक बोनस होता. “अरे, आर्या असं म्हणणार नाही” किंवा “दौलत तसं म्हणणार नाही” असे म्हणण्याइतपत ते त्यांच्या भूमिकेला ओळखत होते. त्यांना त्यांची पात्रे इतकी चांगली माहीत होती की त्यांच्यासोबत काम करणे खूप आनंददायक होते.”

सुष्मिता सेन आर्या सरीनच्या जबरदस्त भूमिकेत दिसणार असून तिच्यासोबत सिकंदर खेर, विकास कुमार, मायो साराव, अंकुर भाटिया, आकाश खुराना, दिलनाज इराणी हे मुख्य भूमिकेत असतील. आर्याचा दुसरा सीझन, आपल्या कुटुंबाच्या आणि मुलांच्या शत्रूंपासून गुन्हेगारीच्या अंधाऱ्या दुनियेशी लढणाऱ्या आईच्या प्रवासाने सुरू होईल. तिचे कुटुंबच तिची ताकद बनेल की तिचे विश्वासूच तिच्या विरोधात उभे राहतील?


हेही वाचा – Prosthetic Makeup: बॉलिवूडकरांना भावतोय प्रोस्थेटिक मेकअप