बॉलिवूडचे ‘आशिकी’ आणि ‘आशिकी 2’ हे दोन्ही सिनेमे सुपर डुपर हिट ठरले. 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या आशिकीमध्ये अभिनेता राहुल रॉय, अनु अग्रवाल आणि दीपक तिजोरी मुख्य भूमिकेत होते. तर 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी 2’ मध्ये अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर मध्यवर्ती भूमिकेत झळकले. या दोन्ही सिनेमांतील गाणी एव्हरग्रीन ठरली. त्यानंतर आता प्रेक्षक मोठ्या आतुरतेने ‘आशिकी 3’ची वाट पाहत आहेत. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात ‘तू मेरी आशिकी है..’ हे गाणे ऐकू येत आहे. ज्यावरून हा व्हिडीओ ‘आशिकी 3’चा फर्स्ट लूक असल्याचे बोलले जात आहे. (Aashiqui 3 update Kartik Aaryan and Sreeleela video goes viral)
‘आशिकी 3’चा फर्स्ट लूक आऊट?
गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक ‘आशिकी 3’ या सिनेमाची वाट पाहत आहेत. अशात व्हायरल होणाऱ्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडिओत अभिनेता कार्तिक आर्यन दिसतोय. त्याचा अवतार पाहून नायक प्रेमात आकंठ बुडाला आहे, हे समजणे अवघड नाही. तर कार्तिकसोबत या व्हिडिओत ‘पुष्पा 2’ फेम किस्सीक गर्ल अर्थात अभिनेत्री श्रीलीला झळकतेय.
या व्हिडिओत दोघांची रोमँटिक केमिस्ट्री दाखवली आहे. ज्यावरून हा सिनेमा रोमँटिक सिनेमा असेल, हे स्पष्ट होत आहे. तसेच कार्तिकच्या एंट्रीवरून तो गायक आहे हे समजतं. तसेच त्याच्या तोंडी असणारे गाणे ‘तू मेरी आशिकी है…’ यावरून हा व्हिडीओ 100% ‘आशिकी 3’चा फर्स्ट लूक आहे, असा तर्क लावला जातोय.
कार्तिक- श्रीलीलाची केमिस्ट्री
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत कार्तिक आर्यन आणि श्रीलीला झळकतेय. वाढलेले केस- दाढी, तोंडात सिगारेट आणि हातात गिटार असा काहीसा कार्तिकचा लूक तो गायक असल्याचे दर्शवतो. ‘तू मेरी आशिकी है…’ म्हणत तो एंट्री घेतो. पुढे कार्तिक आणि श्रीलीला एकत्र दिसून येतात. त्यांची रोमँटिक केमिस्ट्री व्हिडिओचा ताबा घेते आणि अर्थात सर्व प्रेक्षकांचेही लक्ष वेधून घेते. हातात गिटार आणि मिठीत प्रियसी हे समीकरण ‘आशिकी 3’चा संकेत देत आहे. त्यामुळे प्रेक्षकांकडून लावला जाणारा तर्क खरा असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अनुराग बसू दिग्दर्शित या सिनेमाचे नाव अद्याप जाहीर केलेले नाही. मात्र, लवकरच सिनेमाबाबत अधिक माहिती दिली जाईल. हा सिनेमा 2025 याच वर्षात प्रदर्शित होणार असल्याचे या व्हिडिओतून स्पष्ट केले आहे. सिनेमाची निर्मिती भूषण कुमार आणि क्रिशन कुमार यांनी केली आहे. संगीत प्रीतमचे आहे तर विशाल मिश्राचा मधुर आवाज गाण्यांना लाभलाय.
हेही पहा –
Amruta Khanvilkar : सुशीला- सुजीतमध्ये अमृता? अभिनेत्रीच्या पोस्टमूळे चर्चांना उधाण