Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन स्वतंत्र संगिताला चांगले दिवस अन् श्रोतेही, आस्था गिल म्हणते...

स्वतंत्र संगिताला चांगले दिवस अन् श्रोतेही, आस्था गिल म्हणते…

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका आस्था गिलने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले. आस्थाचे प्रत्येक गाणं रिलीज होताच ते तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय होते. यावरच आज आस्थाने संगीत क्षेत्रात आल्याने ती स्वत:ला भाग्यवान समजतेयं. आस्था गिलने आजपर्यंत प्रसिद्ध रॅपर बादशहासोबत बॉलिवूडला अनेक जबरदस्त गाणी दिली आहेत. यामध्ये ‘डीजे वाले बाबू’ आणि ‘पानी पानी’ सारख्या सुपरहिट गाण्यांचा समावेश आहे. याशिवाय अकासासबोत ‘बज’ आणि ‘नागिन’ गाण्यांमुळे फार कमी वेळात ती यशाच्या शिखरावर पोहचली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aastha Gill (@aasthagill)

- Advertisement -

यावर आस्थाने सांगते की, स्वतंत्र संगीत क्षेत्र चांगल्याप्रकारे विकसित होत असून या वेगवाने प्रगती करणाऱ्या क्षेत्राचा मी एक भाग असल्याने मला आनंद होतोयं. प्रेक्षकांमध्येही आता संगीताविषयी अभिरुची निर्माण होत आहे. लोकांना माहित असते जगात काय सुरुयं, संगीत कसे तयार केले जाते हे लोकांना माहित आहे. त्यामुळे बहुतेक लोक ते शिकत आहेत. हे पाहून मला खूप धन्यता वाटते.

ती पुढे सांगते, “एक काळ असा होता की मी अलीशा चिनाई आणि बॅण्ड वाइवा यांची गाणी ऐकायचे. पण आता मी इथपर्यंत पोहलची की लोक माझी गाणी ऐकतात. कधीकधी मला या गोष्टीवर विश्वास ठेवणे कठीण होते की हे गाणे खरंच मी गायलेयं का? पण होय, सर्व कलाकारांसाठी हा एक सुवर्णकाळ आहे आणि प्रत्येकजण आपल्या परिने काम करत आहे. आपली वेगळी कला दाखवणाऱ्या सर्व भारतीय कलाकारांचा मी आदर करते. आस्था लवकरच ‘खतरों के खिलाडी’ सीझन ११ या रिएॅलिटी टीव्ही शोमध्ये सहभागी होणार आहे.


- Advertisement -

 

- Advertisement -