अभय देओलच्या ‘लव्ह लाईफ’मध्ये शिलो सुलेमानची एंट्री

Abhay Deol Shares Mushy Pics with Shilo Shiv Suleman Making Relationship Instagram Official?
अभय देओलच्या 'लव्ह लाईफ'मध्ये शिलो सुलेमानची एंट्री

आपल्या हटके अभिनय कौशल्याने बॉलिवूडमध्ये वेगळी छाप निर्माण करणारा अभिनेता म्हणजे अभय देओल. जवळपास १५ वर्षांच्या बॉलिवूड करिअरमध्ये त्याने विविध पूर्ण भूमिका साकारल्या. तूर्तास तो फार कमी चित्रपटांमध्ये झळकला. मात्र त्याचे जुने सिनेमेही आजही चर्चेत असतात. अशातच आत्ता अभयच्या सिनेमांची नाही तर त्याच्या ‘लव्ह लाईफ’ची फार चर्चा सुरु आहे. कारण अभय देओल पुन्हा एकदा प्रेमाच पडलाय. अभयने शेअर केलेल्या फोटोंवर आता उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.

गतवर्षात अभयच्या लव्ह अफेअरच्या अशाच अनेक चर्चा रंगल्या. अभयची सेलिब्रिटी मॅनेजर आणि आर्टिस्ट साइरिना मामिकसोबत नाव जोडलं गेलं होतं. पण आता अभयच्या लाईफमध्ये शिलो शिव सुलेमान हिची एंट्री झाल्याचं मानलं जातेय. अभयने तिच्यासोबतचे काही फोटो शेअर केलेत. यात अभय तिच्यासोबत फ्लर्टी पोज देताना दिसतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhay Deol (@abhaydeol)

या फोटोसह अभयने ‘फ्ल्यूड, फ्री, फ्लोइंग, सूदिंग, फन, फिअरलेस, सेन्शुअल, डायनॅमिक, टॅलेंटेड, सेक्सी… आणि या सर्व गोष्टी शिलो शिव सुलेमानमध्ये आहेत,’ असं कॅप्शन लिहिली आहे. मात्र अभयचं शिलो शिव सुलेमानसह काय नातं आहे. हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण सध्या दोघांच्या फोटोंची जोरदार चर्चा सुरु आहे.

यापूर्वी अभयचे साइरिना मामिकसोबत रिलेशनशिप सुरु होते. दोन वर्ष हे दोघं एकमेकांना डेट करत होते. विशेष म्हणजे साइरिनाने अभयच्या घरी सेल्फ आयसोलेशनमध्ये वेळ घालवताना दिसली. साइरिनाआधी अभय देओलचे प्रीति देसाईसोबत रिलेशनशिप होते. दोघही सुमारे ४ वर्ष एकमेकांना डेट करत होते. मात्र प्रीतिसोबत ब्रेकअपनंतर अभय डिप्रेशनमध्ये गेला होता, असंही म्हटल जातं.

‘सोचा ना था’ या चित्रपटातून अभयने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात अभयसह आयशा टाकिया झळकली होती. यातील अभयच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. यानंतर त्याने आहिस्ता-आहिस्ता, हनीमून ट्रॅव्हल्स प्राय.लिमिटेड, एक चालीस की लास्ट लोकल, देव डी, आयशा, जिंदगी ना मिलेगी दोबारा, शंघाई, हॅपी फिर भाग जाएगी, नानू की जानू अशा अनेक चित्रपटांत त्याने काम केलं.