Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'कॅन्सर'शी झुंज देणाऱ्या अभिज्ञा भावेच्या पतीची भावनिक पोस्ट

‘कॅन्सर’शी झुंज देणाऱ्या अभिज्ञा भावेच्या पतीची भावनिक पोस्ट

Subscribe

मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा भावे ओळखली जाते. अभिज्ञा ही सोशल मीडियावर सक्रिय असते. अनेक फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अशात अभिज्ञा भावे गेल्य़ा वर्षी मेहुल पैसोबत लग्न गाठ बांधली. पण सध्या तिचा पती मेहुल हा कॅन्सर या जीवघेण्या आजाराशी झुंज देत आहे. नुकतंच मेहुलने अभिज्ञासोबतचा एक फोटो पोस्ट करत याची माहिती दिली आहे. या फोटोत अभिज्ञा आणि तो एका रुग्णालयात असल्याचे दिसत आहे. अभिज्ञाकडूनही मेहुलला

तर दुसऱ्या एका फोटोमध्ये अभिज्ञा मेहुलच्या डोक्यावर किस करताना दिसतेय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने म्हटले की, “मला आयुष्यात अनेक मूर्ख लोक भेटले. पण कॅन्सर हा त्यापैकी सर्वात मोठा आहे… माफ करा मला…तू चुकीच्या व्यक्तीला निवडलं आहेस. या फोटोंवर आता चाहते मेहुलच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहे. तर अभिज्ञाचे सहकलाकार आणि मित्रपरिवाराकडूनही कमेंट्स केल्या जात आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhidnya bhave (@abhidnya.u.b)

- Advertisement -

अभिज्ञाची जवळची मैत्रीण अभिनेत्री मयुरी देशमुखनेही कमेंट करत तिला धीर दिला आहे. तू रॉकस्टार आहेस..तू ही लढाई नक्की जिंकणार… असं मयुरी देशमुखने म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhidnya bhave (@abhidnya.u.b)

- Advertisement -

अभिज्ञा भावे हीने चाहत्यांच्या मनावर वेगळी छाप निर्माण केली आहे. अभिज्ञाने गेल्या वर्षी मेहुलसोबत प्रेम विवाह केला. अभिज्ञा आणि मेहुल एकाच कॉलेजमध्ये शिकले असून जवळपास 15 ते एकमेकांना ओळखायचे. मात्र कॉलेजनंतर त्यांचा संपर्क कमी झाली. परंतु पुन्हा एकदा दोघेही एकमेकांच्या संपर्कात आले. त्यानंतर दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. यानंतर दोघांनी 6 जानेवारी 2021 रोजी लग्नगाठ बांधली. मात्र लग्नानंतर वर्षभराने मेहुलला कॅन्सरचे निदान झाले आहे. त्यामुळे त्याच्यावर सध्या मेहुल रुग्णालयात उपचार घेत आहे.


‘वलीमाई’ आणि ‘भीमला नायक’ने बॉक्स ऑफिसवर आलियाच्या ‘गंगूबाई’ला टाकले मागे

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -