Bigg Boss 15: Salmanला कोणी मोठं झालेलं पहावत नाही, बिचुकलेंना राग अनावर

प्रेक्षकांनी माझं कौतुक केलं हे त्याला पहावलं नाही.  कोणी मोठं झालेलं त्याला आवडत नाही. त्याला वाटत तो एकटाच शो चालवतो. माझ्यासमोर सलमान कमी पडला आणि म्हणून त्याचा मत्सर जागा झाला आणि तो माझ्यावर चिडला

abhijeet bichukale slams salman khan after he out from bigg boss 15
Bigg Boss 15: Salmanला कोणी मोठं झालेलं पहावत नाही, बिचुकलेंना राग अनावर

बिग बॉस 15 (Bigg Boss 15) मधून बाहेर आल्यानंतर अभिजीत बिचुकलेंनी (abhijeet bichukale)  सलमान खान (salman khan)  विरोधात चांगलाच संताप व्यक्त केला आहे. सलमान खानला कोणीही मोठे झालेले पहावत नाही. सलमानसारखे 100 सलमान मी घराची गल्ली झाडायला उभे करेन असे वक्तव्य अभिजीत बिचुकले यांनी केला आहे. एबीपी माझाशी ते याबाबत बोलत होते. सलमान खानला कोणीही मोठं झालेलं आवडत नाही. पण आता वाघ पिंजऱ्यातून बाहेर आला हे लक्षात ठेवा असा इशारा देखील बिचुकलेंनी सलमानला दिला आहे.

प्रेक्षकांनी माझं कौतुक केलं हे त्याला पहावलं नाही.  कोणी मोठं झालेलं त्याला आवडत नाही. त्याला वाटत तो एकटाच शो चालवतो. माझ्यासमोर सलमान कमी पडला आणि म्हणून त्याचा मत्सर जागा झाला आणि तो माझ्यावर चिडला, असे बिचुकलेंनी म्हटले.

बिग बॉसच्या घरात माझ्याविषयी अनेक गोष्टी दाखवल्या गेल्या. बाहेर त्याचा इश्यू केला गेला. मी घरात शिवी दिली त्याचा बाऊ करण्यात आला. सलमान खान नावाची व्यक्ती स्वत:ला काय समजतो माहिती नाही. बिग बॉसच्या घरात त्याने माझ्याशी बोलताना जी भाषा वापरली ती आतापर्यंत माझ्याशी कोणीही वापरली नव्हती. अभिजीत बिचुकले कोण आहे हे सलमानला माहिती नाही. पण माझ्या महाराष्ट्राच्या जनतेला ते माहिती आहे,असे बिचुकले म्हणाले.

सलमान खान तू अजून अंड्यात असून तुला अंड्यातून बाहेर यायचे आहे. बाहेर आल्यावर त्याला कळेल की हा बिचुकले कोण आहे आणि त्याने कोणाशी पंगा घेतला आहे. मी दिल्लीतून आलेला गायक नाही? शाहू, फुले आंबेडकरांना मानणारा मी आहे. तुझ्यासारखे 100 सलमान मी गल्ली झाडायला दारात उभे करेन. वाघ पिंजऱ्यात होता म्हणून चाबूक फिरवत होता पण आता वाघ बाहेर आलाय, असा इशारा यावेळी बिचुकलेंनी दिला. हिंदी बिग बॉसमध्ये सध्या काय सुरू आहे याविषयी मी सविस्तर माहिती देणार असल्याचे बिचुकले यांनी सांगितले आहे. यासंदर्भात ते पत्रकार परिषद घेणार आहेत.


हेही वाचा – ‘सलमान स्वत:ला भाई समजतो, पण मी दादा आहे’, हिंदी Bigg Boss 15 मधून बाहेर येताच बिचुकलेंचा संताप