‘सलमान स्वत:ला भाई समजतो, पण मी दादा आहे’, हिंदी Bigg Boss 15 मधून बाहेर येताच बिचुकलेंचा संताप

त्या घरात माझ्याविषयी काय बोलले गेले आणि टीव्हीवर काय दाखवले गेले या सगळ्याचा मी अभ्यास करतोय आणि सगळ्याचा सविस्तर खुलासा मी करेन.

Abhijeet Bichukle slams salman khan after out in Bigg Boss 15
'सलमान स्वत:ला भाई समजतो, पण मी दादा आहे', हिंदी Bigg Boss 15 मधून बाहेर येताच बिचुकलेंचा संताप

सध्या हिंदी बिग बॉस 15 चांगलाच गाजतोय. गेले अनेक दिवस अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukle)   आणि सलमान खान यांच्यात सुरू असलेला संघर्ष प्रेक्षक पाहत होते. मात्र अभिजीत बिचुकले आता बिग बॉस15 मधून बाहेर आले असून त्यांनी सलमान खान आणि बिग बॉस 15 वर चांगलीच टीका आहे. सलमान खान स्वत:ला भाई समजतो, पण मी पण दादा आहे, अशी टीका अभिजीत बिचुकले यांनी सलमान खानवर केली आहे. हिंदी बिग बॉसमध्ये सध्या काय सुरू आहे याविषयी मी सविस्तर माहिती देणार असल्याचे त्यांनी म्हटलेय. टीव्ही 9मराठीशी ते बोलत होते.

गेल्या अनेक दिवसांपासून अभिजित बिचुकले बिग बॉसच्या घरातून मला बाहेर जायचे असल्याचे म्हणत होते. ‘मी बिग बॉसमध्ये गेले नव्हतो हिंदी बिग बॉसने मला बोलावून घेतले’, असे बिचुकले यांनी म्हटले आहे. मागच्या दोन अडीच महिन्यात बिग बॉसच्या घरात काय सुरू आहे याचा सविस्तर खुलासा ते पत्रकार परिषदेत करणार आहेत. ‘बिग बॉसने मला काढून टाकले नसून मी स्वत: घरातून बाहेर पडलो. त्यांनी मला बळजबरी घरात थांबण्याची सक्ती केली होती. त्यांनी मला बोलावले म्हणून गेलो. नाहीतर हिंदी बिग बॉसशी माझे काहीही घेणे देणे नाही’,असे बिचुकलेंनी सांगितले. त्या घरात माझ्याविषयी काय बोलले गेले आणि टीव्हीवर काय दाखवले गेले या सगळ्याचा मी अभ्यास करतोय आणि सगळ्याचा सविस्तर खुलासा मी करेन असे ते म्हणाले.

बिग बॉसच्या घरात सध्या तिकीट टू फिनालेसाठी चुरशीची लढत सुरू आहे. खरंतर आजच्या एपिसोडमध्ये रश्मी देसाई, देवोलिया भट्टाचार्य आणि अभिजीत बिचुकले यांच्यात लढत होणार आहे. मात्र त्याआधीच अभिजित बिचुकले स्वत:हून घराबाहेर पडले आहेत. द खबरीच्या वृत्तानुसार, देवोलीना आणि अभिजीत बिचुकले घरातून बाहेर पडले आहेत. आता बिग बॉस 15 मध्ये शमिता शेट्टी, करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, रश्मी देसाई, निशांत भट्ट, प्रतिक सहजपाल हे स्पर्धक उरले आहेत.


हेही वाचा – Bigg Boss 15: Tejasswi Prakashच्या कमेंटमुळे ढसाढसा रडला Pratik Sehajpal