घरमनोरंजनअभिजीत खांडकेकरचे ओटीटीवर पदार्पण

अभिजीत खांडकेकरचे ओटीटीवर पदार्पण

Subscribe

रोझ ऑडिओ व्हिज्युअल्सची निर्मिती असलेली ही 9 भागांची मालिका म्हणजे रोमँटीक थ्रिलर असून त्यात गुलशन देवैय्याह आणि द्रष्टी धामीसह अभिजीत खांडकेकर, बरखा सेनगुप्ता, राजेश खट्टर, दिव्या सेठ, झाकीर हुसेन सहाय्यक भूमिकांत झळकणार आहेत.

झी5 हा भारताचा सर्वात मोठा देशी ओटीटी मंच असून या माध्यमातून अब्जावधी प्रेक्षकांना सेवा उपलब्ध करून देण्यात येत असून त्यांनी अलीकडेच – ‘दुरंगा’ या आगामी सिरीजची घोषणा केली. हा कार्यक्रम म्हणजे कोरियन मालिका – ‘फ्लॉवर ऑफ इव्हील’ची अधिकृत हिंदी स्विकार आहे. रोझ ऑडिओ व्हिज्युअल्सची निर्मिती असलेली ही 9 भागांची मालिका म्हणजे रोमँटीक थ्रिलर असून त्यात गुलशन देवैय्याह आणि द्रष्टी धामीसह अभिजीत खांडकेकर, बरखा सेनगुप्ता, राजेश खट्टर, दिव्या सेठ, झाकीर हुसेन सहाय्यक भूमिकांत झळकणार आहेत.

अभिजीत खांडकेकर हा लोकप्रिय मराठी अभिनेता दुरंगा मालिकेत नामांकित क्राईम रिपोर्टर विकास सोराडे व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. त्याची व्यक्तिरेखा समित पटेलची खरी बाजू उलगडून लोकांसमोर आणण्याच्या प्रयत्नात दिसेल. तरीच विकासच्या मिशनची माहिती समजताच आपले बराच काळ दडपून ठेवलेले सत्य लपवण्याची खटपट समित करताना पाहायला मिळेल. अभिजीत हा लोकप्रिय मालिका आणि सिनेमे – माझ्या नवऱ्याची बायको, तुझेच मी गीत गात आहे, धर्मवीर आणि तत्सम भूमिकांसाठी ओळखला जातो.

- Advertisement -

दुरंगामधील त्याने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. आपल्या भूमिकेविषयी बोलताना अभिजीत खांडकेकर म्हणाला, “दुरंगासारख्या कार्यक्रमासोबत मी माझा ओटीटी प्रवास सुरू करतो आहे याचा आनंद वाटतो. फ्लॉवर ऑफ इव्हीलसारख्या एखाद्या कोरियन मालिकेचा हिंदी स्विकार पहिल्यांदाच करण्यात आला. फ्लॉवर ऑफ इव्हील प्रचंड यशस्वी ठरल्याने हीच जादू दुरंगा देखील करेल अशी मला आशा वाटते. मला माझ्या ड्रीम टीम सोबत, सहकलाकार, दिग्दर्शक आणि निर्मात्यांसह काम करण्याची संधी मिळते आहे. त्यांनी या मालिकेसाठी एक अभिनेता म्हणून प्रोत्साहन दिले आणि खुलवले. त्याशिवाय मी रंगवत असलेले पात्र कथेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे आणि माझ्या कामाबद्दल मी खरंच आनंदी आहे. माझ्या मराठी भूमिकांसाठी प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आणि माझ्या या प्रवासासाठी देखील ते मला साह्य करतील ही आशा आहे”.

 


हेही वाचा :‘मराठी चित्रपटसृष्टी ही प्रचंड धोक्यात’, प्राईम टाईम मुद्द्यावरील अक्षय वाघमारेची पोस्ट चर्चेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -