Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन ऐश्वर्याला अभिषेकने शुभेच्छा दिल्या; पण काही तासातच डिलीट केली इन्स्टा पोस्ट!

ऐश्वर्याला अभिषेकने शुभेच्छा दिल्या; पण काही तासातच डिलीट केली इन्स्टा पोस्ट!

Subscribe

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा आज वाढदिवस. आज ऐश्वर्या ४६ वर्षांची झाली. ऐश्वर्याच्या वाढदिवसानिमित्त सगळेच तीला शुभेच्छा देत आहेत. अभिषेक बच्चनेही आपल्या खास अंदाजात ऐश्वर्याला शुभेच्छा दिल्या. अभिषेकने ऐश्वर्याचा अत्यंत सुंदर फोटो शेअर केला आणि तिला चक्क इटालियन भाषेत शुभेच्छा दिल्या. त्यांनी लिहिले, ‘हॅपी बर्थ डे प्रिंसीपेसा’. इटालियन भाषेत राजकुमारीला ‘प्रिसीपेसा’ म्हणतात. या पोस्टवर कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पडला. पण काही तासातच अभिषकने ही पोस्ट डिलीट केली. आता ही पोस्ट अभिषेकने का डिलीट केली याचीच चर्चा रंगली आहे.
अभिषेकने एॅशचा तो फोटो डिलीट करून दुसरा फोटो शेअर केला आहे. पण यावेळी त्याने फक्त प्रिन्सेस एवढच लिहीलं आहे. आता अभिषेकने वाढदिवसा दिवशी अचानक असा फोटो का डिलीट केला यावरून चाहत्यांमध्ये उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.

View this post on Instagram

Princess!

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan) on

- Advertisement -

एश्वर्या सध्या रोममध्ये आहे. तेथे एका इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी ती गेली आहे. ती आपल्या कुटुंबीयांसोबत रोममध्येच आपला वाढदिवस साजरा करणार आहे. असं म्हटलं जातंय की तिच्या वाढदिवसासाठी संपूर्ण बच्चन कुटुंबाने एक सरप्राइज पार्टी प्लान केली आहे.

- Advertisement -

ऐश्वर्याने २०११ मध्ये गर्भवती झाल्यामुळे सिनेमातून ब्रेक घेतला होता. नंतर २०१५ मध्ये संजय गुप्ताच्या ‘जज्बा’ या चित्रपटाद्वारे तिने कमबॅक केला होता. ऐश्वर्याचे ‘ऐ दिल है मुश्किल’ (२०१६) आणि २०१८ मध्ये आलेला ‘फन्ने खान’ अशा दोन चित्रपटात दिसली. असं म्हटलं जात आहे की ती गुलाब जामुन या आगामी चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत पती अभिषेक बच्चनचीही भूमिका आहे.

- Advertisment -