अभिषेक बच्चन अमिताभ यांच्या इतका प्रतिभावंत नाही… पाकिस्तानी लेखिकेचं ट्वीट चर्चेत

नुकत्याच काही दिवसांपूर्वी फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स पार पडला. ज्यात अभिनेता अभिषेक बच्चनच्या ‘दसवी’ या वेबसीरिजला बेस्ट वेबसीरिज या अवॉर्ड देण्यात आला. याचं निमित्ताने महानायक अमिताभ यांनी अभिषेकचे कौतुक करत एक ट्वीट शेअर केले होते. ज्यात त्यांनी अभिषेकचे खूप कौतुक केलं होतं. मात्र, अमिताभ यांनी अभिषेकचं केलेलं कौतुक अनेकांना रुचलं नाही.

याचं संदर्भात पाकिस्तानी लेखिका तस्लीम नसरीन एका ट्वीटमुळे चर्चेत आली आहे. तिने तिच्या ट्वीटर अकाऊंटवरुन अभिषेक बच्चन अमिताभ यांच्या इतका टॅलेंडेट नसल्याचं म्हटलं आहे. शिवाय त्यांच्या या ट्वीटवर अभिषेक बच्चनने प्रतिक्रिया देखील दिली आहे.

तसलीमा नसरीनचं ट्वीट

तसलीमाने ट्वीटरवर लिहिलं की, अमिताभ बच्चन आपला मुलगा अभिषेक बच्चनवर खूप प्रेम करतात. त्यामुळे त्यांना वाटतं की, त्यांच्या मुलाला त्यांची प्रतिभा वारसा म्हणून मिळाली आहे आणि तो सर्वात चांगला आहे. अभिषेक चांगला आहे, परंतु मला नाही वाटत की, अभिषेक अमिताभ यांच्या इतका प्रतिभावंत आहे. ” तसलीमाच्या या ट्वीटवर काही वेळातच अनेकांनी प्रतिक्रिया दिली. शिवाय अभिषेकने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अभिषेक बच्चनने दिली प्रतिक्रिया


अभिषेक बच्चनने तसलीमाच्या ट्ववीटवर प्रतिक्रिया देत लिहिलंय की, “एकदम खरं मॅम, प्रतिभा किंवा इतर कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांच्याशी कोणीही तुलना करु शकत नाही. ते नेहमी सर्वश्रेष्ठ असणार मला मुलगा म्हणून त्यांचा अभिमान आहे.”

 


हेही वाचा :

फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स : ‘रॉकेट बॉईज’ला 6 पुरस्कार; ‘पंचायत 2’ आणि ‘दसवी’चा सुद्धा जलवा