बच्चन कुटुंबीयांच्या आयुष्यातील ‘या’ जवळच्या व्यक्तीचा जगाला निरोप; अभिषेकने शेअर केली भावनिक पोस्ट

कान पुरस्कार सोहळ्यानंतर बच्चन कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यासंदर्भात अभिषेक बच्चन याने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

Abhishek Bachchan Mourns Akbar Shahpurwala Who Made His First Suit And Dad Amitabh's Costumes
बच्चन कुटुंबियांच्या आयुष्यातील 'या' जवळच्या व्यक्तीचा जगाला निरोप; अभिषेकने शेअर केली भावनिक पोस्ट

जगातील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या 75व्या आंतरराष्ट्रीय कान चित्रपट पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या यांनी हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्यानंतर हे बच्चन कुटुंबीय नुकतेच भारतात दाखल झाले आहेत. मात्र या पुरस्कार सोहळ्यानंतर बच्चन कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यासंदर्भात अभिषेक बच्चन याने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

प्रसिद्ध सूट स्टायलिस्ट अकबर शाहपुरवाला (Akbar Shahpurwala) यांचे निधन झाले आहे. अकबर आणि बच्चन कुटुंबियांचे जवळचे नाते असल्याचे अभिषेकच्या पोस्टवरून दिसून येत आहे. कारण अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आपले सूट्स अबकर यांच्याकडून शिवून घ्यायचे. याशिवाय अभिषेक लहान असताना त्याचा सर्वांत पहिला सूटसुद्धा अकबर यांनीच शिवला होता. यामुळे अकबर यांच्या जाण्याने बच्चन कुटुंबिय अधिक भावूक झाले आहेत. अभिषेक अकबर यांना अक्की अंकल म्हणून हाक मारायचा. अभिषेकने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘अकबर’ यांच्या सूट लेबलचा फोटो पोस्ट करत शोक व्यक्त केला आहे.

अभिषेकची भावनिक पोस्ट-

‘घरी आल्यावर अत्यंत दु:खद बातमी समजली. फिल्म इंडस्ट्रीतील एक महान व्यक्ती अकबर शाहपुरवाला यांचं निधन झालं. मी त्यांना अक्की अंकल म्हणून हाक मारायचो. त्यांनी माझ्या वडिलांचे अनेक पोशाख शिवून दिले. जेवढं मला आठवतंय, त्यांनी माझ्या वडिलांप्रमाणे माझेही अनेक सूट्स शिवले दिलेत. याशिवाय माझ्या चित्रपटांसाठी त्यांनी सूट्स तयार केलेत. त्यांनी मला शिवून दिलेला पहिला सूट मी रेफ्युजी या चित्रपटाच्या प्रीमिअरला परिधान केला होता. अजूनही तो सूट मी जपून ठेवला आहे’.

अभिषेकने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, ‘जर तुमचा पोशाख किंवा सूट कचिन्स आणि त्यानंतर गबाना यांनी बनवला असेल, तर तुम्ही स्टार झालात असं समजा. एवढा त्यांचा फिल्म इंडस्ट्रीत प्रभाव होता. जर त्यांनी स्वत: तुमच्या सूटचा कापड कापला असेल, तर त्यांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे असं समजायचं. ते मला नेहमी म्हणायचे की, सूटचं कापड कापणं म्हणजे फक्त शिवणकाम नाही, तर त्या भावना आहेत. जेव्हा तू माझा सूट परिधान करतोस, तेव्हा त्यातील प्रत्येक धागा, शिलाई ही प्रेमाने आणि माझ्या आशीर्वादाने विणलेली असते. माझ्यासाठी ते जगातील सर्वोत्कृष्ट सूट मेकर होते. आज मी तुम्ही शिवलेला सूट परिधान करेन, अक्की अंकल. तुमच्या आत्म्याला शांती लाभो’, अशा भावना त्याने व्यक्त केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan)

अभिषेकच्या या पोस्टवर आता अनेकांकडून श्रद्धांजलीच्या कमेट्स येत आहेत. त्याची बहीण श्वेता बच्चननेही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, बॉबी देओल, निम्रत कौर, डब्बू रत्नानी, मनिष मल्होत्रा यांनीसुद्धा कमेंट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. अमिताभ बच्चन यांनीसुद्धा अकबर यांच्यासाठी पोस्ट लिहित शोक व्यक्त केला.


‘कान’च्या रेड कार्पेटवर गुत्थीची एंट्री, व्हाईट गाऊनमध्ये सुनील ग्रोव्हरचा हटके लूक व्हायरल