घरमनोरंजन'बॉब बिस्वास'साठी अभिषेकने स्ट्रीट फूड खात वाढवल तब्बल १०५ किलो वजन

‘बॉब बिस्वास’साठी अभिषेकने स्ट्रीट फूड खात वाढवल तब्बल १०५ किलो वजन

Subscribe

गेली अनेक वर्षे बॉलिवूडपासून दूर असलेला अभिनेता अभिषेक बच्चन पुन्हा एकदा इंडस्ट्रीत एन्ट्री घेण्यास सज्ज झाला आहे. अभिषेक बच्चन याला इंडस्ट्रीत आज वीस वर्षे पूर्ण झाली आहेत. या वीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्याने आजवर अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. अशातच अभिषेक गेल्या काही दिवसांपासून ‘द बिग बुल’ आणि ‘ब्रेथ २’ या चित्रपट आणि वेबसीरिजमुळे सर्वाधिक चर्चेत आला. विशेष म्हणजे प्रेक्षकांच्या मनात घर करण्यासाठी अभिषेक पुन्हा एकदा जोमाने काम करतोय. यात अभिषेक लवकरचं ‘बॉम्ब बिस्वास’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली असून अभिषेकने चक्क आपले वजन १०५ किलोपर्यंत वाढवले आहे.

या चित्रपटात अभिषेक एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. आणि या भूमिकेला न्याय देण्यासाठी त्याने सर्वोतोपरी मेहनत घेतली आहे. या चित्रपटात तो ‘बॉब’ ही भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठीच अभिषेकने त्याचं वजन चक्क १०५ किलोपर्यंत वाढवलं आहे. या भूमिकेविषयी बोलताना अभिषेक एका मुलाखतीत म्हणाला की, दिया (चित्रपटाची दिग्दर्शिका दिया अन्नपूर्णा घोष) यांना बॉब भूमिकेसाठी किलर नाही तर एक सामान्य माणूस हवा होता. तो माणूस ट्रेनमध्ये  तुमच्या बाजूला बसला तरी तो कॉन्ट्रॅक्ट किलर आहे हे कळले नाही पाहिजे. ‘बॉब बिस्वास’ यांचे वैशिष्ट्य म्हणजे तो अतिशय साधा व्यक्ती आहे. तो खूप गोड आणि मेणासारखा माणूस आहे. पण त्याला करावे लागणारे काम त्याच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध आहे. मला या व्यक्तिरेखेचा कॉन्ट्रास्ट खूप आवडला.

- Advertisement -

तर व्यक्तिरेखेसाठी वाढलेल्या वजनावर बोलताना अभिषेक याने सांगितले की, “या व्यक्तिरेखेसाठी मी १०२ किलो ते १०५ किलोदरम्यान वजन वाढले आहे. आम्ही ठरवलं होतं की बॉब कसा दिसायचा? या व्यक्तिरेखेसाठी आम्ही प्रोस्थेटिक मेकअप वापरू शकलो असतो, परंतु मला नेहमीच असे वाटायचे की, जेव्हा आपण मेकअप वापरतो तेव्हा तो मेकअप लगेच दिसून येतो. पण तुमचे वजन वाढले की, त्याचा तुमच्या देहबोलीवरही परिणाम होतो आणि मग कामगिरी वेगळी दिसते.”

जर तुम्ही या चित्रपटाचा प्रोमो आणि ट्रेलर पाहिला असेल, तर तुम्हाला यात अभिषेकचे गुबगुबीत गाल आणि पसरलेल्या पोटासह सर्व काही बदलले दिसेल. अभिषेकने हे वजन वाढवण्यासाठी खूप काही खाल्ले आहे. यात अनेकदा त्याने सुजॉय (दिग्दर्शक सुजॉय घोष) यांच्या सोबत कोलकात्याच्या थंडीत गूळ-सोन्देश आणि कोलकत्त्याचे स्ट्रीट फूडवर ताव मारल्याचे सांगितले.

- Advertisement -

‘बॉब बिस्वास’ मधील अभिषेकच्या भूमिकेचे बिग बींकडून कौतुक

बिग बींकडून बॉब बिस्वास मधील अभिषेकच्या भूमिकेचे कौतुक करण्यात आले आहे. यावर बोलताना अभिषेक म्हणाला की, “मी अभिताभ जींचा केवळ मुलगाच नाही तर सर्वात मोठा चाहताही आहे. जेव्हा तुमचा हिरो तुमचे काम पाहतो आणि तुमच्या कामाचे कौतुक करतो ही तुमच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट असते. यापेक्षा माणसाला काय हवे असते? मी नेहमी म्हणत आलो की, मी माझ्या कुटुंबासाठी काम करतो. बाबांनी जे लिहिले ते खूपच थक्क करणारे होते. धन्यवाद याशिवाय दुसरे काय बोलू? पण त्यांना ट्रेलर आवडलाय हे छानच आहे. पण ट्रेलरनंतर त्याना हा चित्रपटही आवडला पाहिजे. सोशल मीडियावर लोक माझ्या व्यक्तिरेखेवर खूप प्रेम करत आहेत, पण हा फक्त ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी.”

वजन वाढवण्यासोबतच अभिषेकने बंगाली भाषा देखील शिकली. अभिषेकचा हा आगामी चित्रपट बॉब बिस्वास यांच्या जीवनावर आधारित आहे. २०१२ मध्ये आलेल्या कहानी या विद्या बालनच्या चित्रपटात बॉब बिश्वास हे काल्पनिक पात्र तयार करण्यात आलं होतं. याच पात्रावर आधारित ‘बॉब बिस्वास’ हा चित्रपट असल्याचं सांगण्यात येतं.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -