घर मनोरंजन आता हीरोला हीरोसारखे दिसावे लागत नाही - अभिषेक बच्चन

आता हीरोला हीरोसारखे दिसावे लागत नाही – अभिषेक बच्चन

Subscribe

-हर्षदा वेदपाठक

आर. बालकी दिग्दर्शित घूमर या चित्रपटामध्ये अभिषेक बच्चन यांच्या भूमिकेची खूप स्तुती होत आहे. अचानक अपंगत्व आलेल्या क्रिकेट खेळाडू झालेल्या सैयमी खेर हिच्या बरोबर,अभिषेक तिचा कोच म्हणून दिसेल. नैराश्याच्या गर्तेत असलेला खेळाडू हि भूमिका अभिषेकने उत्तमरित्या सादर केली आहे. त्याबद्दल अभिषेक बरोबर केलेली बातचीत

- Advertisement -

कोरोनामध्ये लोकांना घरी बसून ओटीटी पहायची सवय लागली आहे. अशा वेळेस घूमर हा चित्रपट सिनेमागृहामध्ये, मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे काय सांगशील त्याबद्दल?

सिनेमागृहाच्या काळोखात बसून..कोल्ड्रिंक, आईस्क्रीम आणि खाण्याच्या इतर वस्तू घेऊन सिनेमा पाहण्याची मजा काही औरच असते. आणि मी याच वातावरणात वाढलोय. माझे बालपण हे आई-बाबांच्या फिल्म सेटवर आणि सिनेमागृहांमध्ये चित्रपट पाहण्यात गेले. त्यामुळे मला सिनेमागृह हे देवळापेक्षा कमी नाही वाटत. मला आनंद आहे की, घूमर हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.

- Advertisement -

आर. बालकी यांच्याबरोबर अमिताभ बच्चन आणि तुझे खूप एक वेगळेच नातं आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांच्याबद्दल काय सांगशील?

आर. बालकी यह एक अदभुत किस्म के इन्सान है… खूप वेगळे आहेत ते. मला ते अनोखे दिग्दर्शक आहेत असे वाटते. त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील आगळा आहे. तुम्ही त्यांचा कोणताही चित्रपट पहा. त्यामध्ये त्यांचे सादरीकरण हे तुम्हाला आगळावेगळच वाटणार. मी नेहमी अचंबित होऊन विचार करतो, त्यांच्या आगामी कथानकामध्ये ते आणखीन काय वेगळे आणणार. आणि असा विचार करायला ते त्यांच्या प्रत्येक चित्रपटातील कथानकाने, कलाकार म्हणून मला भाग पाडतात. त्यांची कथा वेगळी असतेच परंतु त्याबरोबर पटकथा देखील आगळी असते आणि तुम्ही ते अनेकदा पाहिलं असेल. घूमर बघाताना, बॅटिंग करणारी एक तरुणी आपला हात गमावून बसते आणि ती निष्णात बॉलर होते. आहे की नाही वेगळं कथानक. हे कमी म्हणून की काय, त्या मुलीला शिकवणारा कोच हा अतरंगी आहे. पॅडी हा मुळात कोच नाही. कोच म्हणून जे काही गुण आणि विशेषतः पाहिजे ती त्याच्याकडे नाही. तसा हा विषय आणि कॅरेक्टर प्लेसमेंट हि त्यांची खासियत आहे.

लुडो नंतर तुझ्या कारकीर्दीला बहर आलाय असं म्हटलं तर वाव ठरणार नाही, काय सांगशील?

काय सांगू ? कारण मी माझं (हसून),अभिनेता म्हणून मी माझं काम केलं आणि त्यानंतर प्रेक्षकांनी माझं काम आवडण्याचं काम केलं. एकंदरीत काय, आम्ही प्रेक्षकांना भुरळ घालायला समर्थ ठरलो. आज सकाळी घरी बसल्या बसल्या, मी केलेल्या कामाची सूची आठवत होतो. मनमर्जीया, लुडो, बॉब विश्वास मला सहज आठवत गेली नावे. मला वेगवेगळ्या भूमिका करायची संधी मिळाली, विशेष म्हणजे मला तसे काम मिळाले हे महत्त्वाचे. एक जमाना होता, जेव्हा हिरोला हिरो सारखेच दिसावे लागायचे. आता टाईम बदलला आहे. मी स्वतःला लकी मानतो, कारण मला एवढी विविधता असलेल्या भूमिकांसाठी विचारले जात आहे.

घूमर मध्ये तुझे बाबा अमिताभ बच्चन हे क्रिकेट समालोचकाच्या भूमिकेत आहेत,काय सांगशील त्याबद्दल?

ते ऐक उत्तम ऍक्टर आहेत, ते आपण सगळेच जाणतो. मी आता त्यावर वेगळं काय सांगणार? चित्रपट हा कलाकार, टेक्निशियन यांच्या कामामुळे चालतो. आणि चित्रपट जेव्हा बॉक्स ऑफिसवर चालतो, तेव्हा प्रत्येक कलाकाराला समाधान लाभते. घूमरबद्दल बोलायचे तर ते खूप प्रेरणादायी कथानक आहे. बाबा हे समालोचक म्हणून काही प्रमाणात हलक्या फुलक्या भूमिकेत येथे दिसतील. या चित्रपटाचे कथानक प्रेक्षकांना लोकांना आवडेल.

बालकी कलाकारांना भूमिका निभावताना कितपत स्वातंत्र्य देतात?

दिग्दर्शक म्हणून ते प्रत्येक कलाकाराला स्वातंत्र्य देतात. कोणतीही भूमिका निभावताना, तुम्हाला ज्या प्रकारे पाहिजे त्या प्रकारे तुम्ही ती निभावू शकता. असं करताकरता ते तुम्हाला अशा लेवल पर्यंत आणतात की, तुमची भूमिका हि तुम्ही, त्यांना अपेक्षित असलेल्या कॅरेक्टर स्केच प्रमाणे सादर करू लागता. एक दिग्दर्शक म्हणून हि त्यांची खासियत खूपच वेगळी आहे. तुम्ही जे काम करत आहात ते करताना, ते तुम्हाला अशी जाणीव करून देतात की, हे सगळं तुमच्या मनाप्रमाणे सुरू आहे. सरते शेवटी मात्र ते सगळं त्यांच्या अपेक्षेप्रमाणेच घडत असतं. बालकी हे खुल्या विचारायचे आहेत. आणि लोकशाही पद्धतीत विश्वास ठेवतात. त्यामुळे तुम्हाला जर एखादी गोष्ट नाही पटली, तर ते ऐकून घ्यायला तयार असतात. आणि त्यासोबत तुमचं स्पष्टीकरण दिलं की काम सोपं होतं.

आमची संवेदनशीलता बऱ्याच प्रमाणात सारखी आहे. चित्रपटाचा विषय कोणताही असो, दिग्दर्शक म्हणून ते समाधानी असतात आणि अभिनेता म्हणून मी सुखावलेला असतो.

कोणतेही गाणं चित्रपटाला हिट करू शकते अशी विचारसरणी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये रूढ आहे. अशा वेळेला घूमर मध्ये एकच गाणे आहे आणि ते शीर्षक गीत आहे काय सांगशील?

जेव्हा तुम्ही एखाद्या चित्रपटाचे विच्छेदन करू लागतात. तेव्हा तुम्ही त्या चित्रपटाचा आराखडाच मातीमोल करता. चित्रपट हा कधीच एका अंगाने यशस्वी होऊ शकत नाही. चित्रपट तयार करताना अनेक गोष्टींचा जोड असते. जे आपल्याला पडद्यावर दिसतं त्यापेक्षा दुप्पट गोष्टी या पडद्यामागे घडत असतात. भारतात आपल्याकडे संगीताला खूप मोठी आणि जुनी पार्श्वभूमी आहे. आपल्याकडे पुराण, पोथ्या मध्ये असलेले पारंपारिक,धार्मिक मसुदे हे अनेकदा गाऊन तयार केले जातात. आपल्याकडे कथा गाऊन सांगणे, हा एक संगीत विषयक वारसाच आहे.

चित्रपट नाही चालला तर ते अपयश तू कशाप्रकारे पचवतोस?

तुम्ही जर कलाकार म्हणून बॉक्स ऑफिसवर नाही चाललात, तर तुम्हाला काम मिळत नाही. तुम्ही जर साधारण कलाकार असाल आणि तुमच्या चित्रपटाची तिकीट जर का बॉक्स ऑफिस वर विकली गेली नाहीत, ते तरी कसं चालेल? अनेक मोठ्या कलाकारांना शुक्रवारच्या दिवशी फर्स्ट डे फर्स्ट शोसाठी ओपनिंग नाही लागत. त्यांच्या चित्रपटाच्या तिकिटांची समाधानकारक विक्री होत नाही. त्यावर उपाय असा काहीच नाही. चित्रपटाचा कंटेंट चांगला असेल, कलाकार म्हणून तुम्ही उत्तम काम केलं असेल. तरी त्यावर निर्णय हा प्रेषकच घेतो. मी जेव्हा चित्रपट स्विकारतो, तेव्हा एकच विचार करतो. माझ्या मधल्या प्रेक्षकाला हा विषय मोठ्या पडद्यावर पाहायला आवडेल का? उत्तर हो आलं तर मी तो चित्रपट स्वीकारतो. आणि त्या पुढचं सगळं प्रेक्षकांवर सोपवून देतो.


हेही वाचा- ‘गदर 2’ला उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल धर्मेंद्र यांनी मानले आभार

- Advertisment -