माहितेय का? अभिषेक बच्चन होणार होता Hema Malini चा जावई पण Esha Deol ने ‘या’ कारणासाठी दिला नकार

हेमा मालिनी (Hema Malini ) यांनी ईशा (Esha Deol) आणि अभिषेक (Abhishek Bachchan) यांच्या लग्नासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र ईशा काही या लग्नाला तयार नव्हती. ईशाने अभिषेकशी लग्न करायला पूर्णत: नकार दिला. त्यानंतर ईशाने तिचा बालमित्रासोबत लग्न केले.

बॉलिवूडची ड्रीम गर्ल सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे हेमा मालिनी (Hema Malini ) हेमा मालिनी यांनी अनेक वर्ष बॉलिवूड प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आणि आजही करत आहेत. त्यांच्या सुंदरतेमुळेच त्यांना ड्रीम गर्ल म्हणून ओळखण्यात येते. हेमा मालिनी यांनी लेजेंड्री अभिनेता धमेंद्र सोबत लग्न केले. हेमा आणि धर्मेंद्र (Dharmendra)  यांना ईशा (Esha Deol ) आणि अहाना देओल (Ahana Deol )  अशा दोन मुली आहे. दोघींची ही लग्न झाली असून हेमा आणि धर्मेंद्र आजी आजोबा झाले आहेत. ईशा देओलने हेमा यांच्या पसंतीच्या मुलाशी लग्न करावे असे त्यांना वाटत होते. मात्र ईशाने तिच्या पसंतीच्या मुलाशी लग्न केले.

खरंतर हेमा मालिनी यांना अमिताभ बच्चनचा (Amitabh Bachchan) मुलगा अभिषेक बच्चनला (Abhishekh Bachchan )   आपला जावई करायचे होते. हेमा मालिनी आणि आमिताभ एकत्र अनेक सिनेमात केले आहे. त्यांच्यात फार चांगली मैत्री आहे. अमिताभच नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला हेमा मालिनी चांगल्या प्रकारे ओळखत होत्या. अभिषेक हा संस्कारी आणि सर्वांचा मान ठेवून वागणार होता. त्याचा हा स्वभाव हेमा मालिनींंला फार आवडत होता. त्यामुळे त्यांना अभिषेकचे ईशा देओलशी लग्न लावून त्याला आपल्या घरचा जावई करायचे होते.

हेमा मालिनी यांनी ईशा आणि अभिषेक यांच्या लग्नासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र ईशा काही या लग्नाला तयार नव्हती. ईशाने अभिषेकशी लग्न करायला पूर्णत: नकार दिला. असे म्हटले जाते की, ईशा अभिषेकला तिच्या भावाप्रमाणे मानत होती. त्यामुळेच तिचा या लग्नाला नकार होता. त्यानंतर ईशाने तिचा बालमित्रासोबत लग्न केले. ईशाचा नवरा एक प्रसिद्ध बिझनेसमॅन आहे. तर दुसरीकडे अभिषेक बच्चन देखील मिस वर्ल्ड ऐश्वर्या रायशी लग्न केले.

हेमा मालिनी यांची तब्येत बिघडली

हेमा मालिनी एक उत्तम अभिनेत्री आहेत मात्र त्या भाजपच्या मथुरेच्या खासदार देखील आहे. हेमा मालिनी यांची प्रकृती अचानक बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. घश्यात अचानक त्रास होऊ लागल्याने त्वरित त्यांची करोना चाचणी करण्यात आली आहे. मात्र उपचारांसाठी त्या तात्काळ दिल्लीला रवाना झाला आहेत. हेमा मालिने यांनी मागच्या काही दिवसात अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली होती. विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर त्या अनेक कार्यक्रमांना उपस्थित होत्या. अनेकांच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र त्यांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. मात्र तरीही त्यांच्या सोबत असलेल्या संपूर्ण स्टॉफची देखील कोरोना चाचणी करण्यात आली आहे.


हेही वाचा – Mumbai Special Pavbhaji: भयंकर अंडरवर्ल्ड क्राईम थ्रिलर ‘मुंबई स्पेशल पावभाजी’