अभिषेकने केलं ‘आग्रा’च्या जेलमध्ये शूटींग

अभिनेता अभिषेक बच्चन ने त्याच्या लूकमध्ये बराच बदल केला आहे. चित्रीकरणासाठी वेगवेगळ्या जागी जाताना आता चक्क तो जेलमध्ये शूटींग करत आहे.

अभिनेता अभिषेक बच्चन लवकरच ‘दसवीं’ या त्याच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. अभिषेक ने त्याच्या लूकमध्ये खूप बदल केला आहे. आता त्याला चित्रीकरणासाठीही विचित्र जागांवर जावे लागत आहे. यावेळी अभिषेकने त्याच्या चित्रपटाचे चित्रीकरण चक्क ‘आग्रा’च्या जेल मध्ये केले आहे. अभिषेकला त्याच्या ‘दसवीं’ चित्रपटातील भूमिकेसाठी अनेक सीन हे जेल मध्ये करावे लागले आहेत. या चित्रपटासाठी गेल्या एक महिन्यापासून अभिषेक आग्राच्या जेलमध्ये शूटींग करत आहे. हा अनुभव अभिषेकसाठी खूप आव्हानात्मक ठरला आहे. सुरुवातीला अभिषेकला शूटींगदरम्यान अनेक अडचणी येत होत्या. जेलमधील वातावरण त्याला फारसे सूट झाले नव्हते. पण काळानुसार त्याने स्वत: लाच बदलले नाहीतर उत्तम शैलीत शूटिंगही पूर्ण केले. या चित्रपटाचे पोस्टरही अभिषेकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan)

 अभिषेकचा या चित्रपटातील अभिनयासोबतच एक जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अभिषेक या चित्रपटात एका दहावी नापास असलेल्या मुख्यमंत्र्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. अभिषेक व्यतीरिक्त यामी गौतम आणि निम्रत कौर हे कलाकारही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यामी ही एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून निम्रत नेत्याची भूमिका पार पाडणार आहे.


हे वाचा- नेहा कक्करची वहिनी होणार ‘ही’ बिग बॉस फेम अभिनेत्री!