HomeमनोरंजनAbhishek Rahalkar: मन धागा धागा जोडते नवा फेम अभिनेत्याचा दणक्यात साखरपुडा, फोटो...

Abhishek Rahalkar: मन धागा धागा जोडते नवा फेम अभिनेत्याचा दणक्यात साखरपुडा, फोटो व्हायरल

Subscribe

अभिनेता अभिषेक रहाळकर हा ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचला आहे. त्यामुळे दिवसागणिक त्याचा चाहतावर्ग वाढू लागला आहे. सोशल मीडियावर देखील त्याच्या फॉलोवर्सची संख्या चांगली आहे. दरम्यान, अभिषेक लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकताच त्याचा साखरपुडा दणक्यात पार पडला.

मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांची सध्या लगीनघाई सुरु आहे. अलीकडेच टीव्ही अभिनेत्री शिवानी सोनार आणि अंबर गणपुळे यांनी साता जन्माची गाठ बांधली. येत्या काळात दिव्या पुगावकर, अंकिता वालावलकर असे बरेच सेलिब्रिटी लग्न करणार आहेत. यातच आता आणखी एका अभिनेत्याची भर पडली आहे. हा अभिनेता म्हणजे अभिषेक रहाळकर. तो सध्या ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारतो आहे. सोशल मीडियावर त्याच्या साखरपुड्यातील एक फोटो व्हायरल झाला आहे. ज्यावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (abhishek rahalkar secretly got engaged)

लवकरच अडकणार लग्नबंधनात

अभिनेता अभिषेक रहाळकर हा ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचला आहे. त्यामुळे दिवसागणिक त्याचा चाहतावर्ग वाढू लागला आहे. सोशल मीडियावर देखील त्याच्या फॉलोवर्सची संख्या चांगली आहे. दरम्यान, अभिषेक लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकताच त्याचा साखरपुडा दणक्यात पार पडला. अभिषेकने कोणत्याही गाजावाजाशिवाय गुपचूप पद्धतीने साखरपुडा उरकल्यामुळे सोशल मीडियावर फोटो व्हायरल होताच चाहत्यांना सुखद धक्का लागला.

कुणी शेअर केला फोटो?

अभिषेकच्या साखरपुड्यातील व्हायरल होणार हा इनसाइड फोटो ‘दुर्गा’ मालिकेत मुख्य भूमिकेत असणाऱ्या अभिनेत्री रुमानी खरेने शेअर केला आहे. तिने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर स्टोरी अपडेट करताना हा फोटो शेअर केला आहे. त्यासोबत तिने ‘Cutiess’ असं कॅप्शन दिलं आहे. रुमानीने हा फोटो शेअर करताना अभिषेक आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीलादेखील टॅग केला आहे. अभिषेकच्या होणाऱ्या पत्नीचे नाव कृतिका असे आहे. या फोटोत आपण पाहू शकतो की, साखरपुड्यासाठी अभिषेकने शेरवानी घातली होती. तर, त्याच्या होणाऱ्या पत्नीने गडद निळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता. अभिषेकने गुडघ्यावर बसून होणाऱ्या पत्नीच्या हातात अंगठी घालल्याचे यात दिसत आहे.

abhishek rahalkar secretly got engaged

रुमानीव्यतिरिक्त अभिनेत्री अक्षता आपटे आणि स्वानंद केतकर यांनीदेखील नव्या जोडप्याला शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट शेअर केल्या आहेत. मुख्य बाब अशी की, अभिषेक रहाळकरने अद्याप साखरपुड्याची घोषणा केलेली नाही. पण, रुमानी खरेने शेअर केलेल्या स्टोरीमुळे ही आनंदाची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व चाहत्यांपर्यंत पोहोचली. आता अभिषेक आपल्या साखरपुड्याची फोटो कधी शेअर करणार? याची उत्सुकता प्रत्येकाला लागलेली आहे.

दरम्यान अभिषेक रहाळकरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, त्याने ‘स्टार प्रवाह’च्या ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारली होती. ही मालिका ऑक्टोबर २०२४ मध्ये ऑफएअर गेली. याशिवाय त्याने ‘झी मराठी’च्या ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेतदेखील महत्वाची भूमिका साकारली होती.

हेही पहा –

Shreyas Talpade & Aloknath : श्रेयस तळपदे आणि आलोकनाथवर FIR दाखल, काय आहे प्रकरण ?

Edited By – Vishakha Mahadik