गायक जुबिन नौटियालचा अपघात; हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत दिली माहिती

बॉलिवूडला अनेक सुपरहिट आणि सर्वोत्कृष्ट गाणी देणारा गायक जुबिन नौटियाल जखमी झाला आहे. घराच्या पायऱ्यांवरून पडल्याने त्याला दुखापत झाली होती. दरम्यान, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. असं म्हटलं जातंय की, त्याची कोपर तुटली असून बरगड्यांनाही तडे गेले आहेत. एवढेच नाही तर त्याच्या डोक्याला दुखापत देखील झाल्याचेही सांगण्यात आलं. दरम्यान आता जुबिनने स्वत: त्याच्या तब्बेतीबद्दल अपडेट दिली आहे.

‘तू सामने आए, ‘मानिके’, ‘बना शराबी’ यांसारख्या गाण्यांमुळे चाहत्यांच्या मनात घर केलेला जुबिन नौटियालच्या पीआरने सांगितलं की, शुक्रवारी 2 डिसेंबर तो घराच्या पायऱ्यांवरुन घसरुन पडला होता. त्यावेळी त्याला मोठी दुखापत झाल्याने डॉक्टरांनी त्याच्या हाताचे ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. परंतु आता सोशल मीडियावरुन हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत जुबिनने स्वत: त्याच्या तब्बेतीबद्दल अपडेट दिली आहे.

जुबिन नौटियालने शेअर केला फोटो

जुबिन नौटियाने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्याचा हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर करत लिहिलंय की, ‘तुमच्या प्रार्थनेबद्दल धन्यवाद. देवाची माझ्यावर कृपा होती त्यामुळे त्याने मला या अपघातातून वाचवले. मला आता डिस्चार्ज मिळाला आहे असून मी बरा होत आहे. तुमचे कधीही न संपणारे प्रेम आणि प्रार्थना केल्याबद्दल धन्यवाद.” या शेअर केलेल्या फोटोमध्ये जुबिन हॉस्पिटलमधल्या बेडवर बसला आहे. त्याच्या एका हाताला फॅक्चर झाला आहे.

चित्रात झुबिन हॉस्पिटलच्या बेडवर बसला आहे. त्याच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर आहे, ते स्पष्ट दिसत आहे. तो डाव्या हाताने अन्न खात आहे आणि कॅमेराकडे पाहत आहे. यासोबतच तो हसतही आहे, जे पाहून आता चाहत्यांना नक्कीच थोडा दिलासा मिळाला आहे.

 

 


हेही वाचा :

…तर हातात शस्त्रच असावं लागतं, शरद पोंक्षेंचं धारदार वक्तव्य