घरमनोरंजनअॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टरचा ट्रेलर आऊट, अनुपम खेर प्रमुख भूमिकेत

अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टरचा ट्रेलर आऊट, अनुपम खेर प्रमुख भूमिकेत

Subscribe

लेखक संजय बारु यांच्या २००४ साली आलेल्या 'अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या पुस्तकावर आधारीत असा हा सिनेमा असून  अनेक कॉन्ट्राव्हर्सीजने भरलेल्या या पुस्तकात बारु यांनी मनमोहन सिंग यांची गळचेपी मांडली आहे

२०१९ च्या लोकसभा निवडणुकांचा परिणाम सिनेमांवर देखील झालेला पाहायला मिळ आहे. राजकारणाशी निगडीत सिनेमे नव्या वर्षात रिलीज होणार आहे. बुधवारी बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर आधारीत ठाकरे या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आणि आज ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’चा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. या सिनेमाच्या ट्रेलरने अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे. कारण माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भूमिका अनुपम खेर यांनी साकारली असून त्यांच्या अभिनयाची सगळीकडे प्रशंसाच केली जात आहे.

कसा आहे ट्रेलर?

लेखक संजय बारु यांच्या २००४ साली आलेल्या ‘अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या पुस्तकावर आधारीत असा हा सिनेमा असून  अनेक कॉन्ट्राव्हर्सीजने भरलेल्या या पुस्तकात बारु यांनी मनमोहन सिंग यांची गळचेपी मांडली आहे. हे पुस्तक वादग्रस्त ठरले होते. यातील कॉन्ट्राव्हर्सीज  दाखवण्याचा प्रयत्न या ट्रेलरमध्ये करण्यात आला आहे. ट्रेलरमधील पहिलेच वाक्य ‘मुझे डॉक्टर साहब भीष्म लगते हे लेकीन वो फॅमिली ड्रामा के शिकार हो गये’ या वाक्यातूनच सिनेमा कसा असणार याचा अंदाज येतो. सोनिया गांधी याचे राहुल गांधी यांना पंतप्रधान पोहोचवण्यासाठीचे राजकारण या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले. काश्मीर प्रश्न आणि न्युक्लिकर एनर्जी डील यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. विजय गुठठे यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून हा सिनेमा येत्या ११ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

- Advertisement -
Thackeray Movie : ‘ठाकरे’ शिवाय अन्य चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही

माणसाची ताकद छातीच्या इंचावरून ठरत नाही; ‘ठाकरे’मध्ये मोदींना टोला

आधी नाकारली होती भूमिका

आधी अनुपम खेर यांनी ही भूमिका नाकारली होती. पण मनमोहन सिंग एका कार्यक्रमादरम्यानचे चालणे पाहून त्यांनी त्यांच्या चालण्याची नकल तब्बल ४५ मिनिटे केली. प्रयत्न करुनही ते त्याच्या विशिष्ट शैलीत चालू शकले नाही. त्यामुळे चॅलेंज म्हणून त्यांनी ते काम स्विकारले. त्यांचे हावभाव, आवाज, राहण्याची पद्धत हे सगळं करण्यासाठी त्यांना ७ महिन्याचा कालावधी लागला.ही मेहनत ट्रेलरच्या पहिल्या सीनपासून दिसून येत आहे.

भोजपुरी चित्रपटांची बॉलीवुडला टक्कर, सर्वाधिक Google सर्च
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -