Wednesday, February 17, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक धक्कादायक! मुलीचे दुःख विसरण्यासाठी 'त्याने' केलं परक्या मुलीचे अपहरण

धक्कादायक! मुलीचे दुःख विसरण्यासाठी ‘त्याने’ केलं परक्या मुलीचे अपहरण

Related Story

- Advertisement -

पोटच्या पोरीला गमावल्याच्या दु:खात आरोपीने परक्या चिमुकलीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना नाशकात घडली होती. मात्र तीन दिवस उलटल्यानंतर ही एक वर्षाची चिमुकली जिल्हा शासकीय रुग्णालय प्रसूती कक्षाबाहेर सापडली आहे. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी मंगळवारी पहाटे आरोपीला ताब्यात घेतले आहे. माणिक सुरेश काळे (४८) असे आरोपीचे नाव आहे. चौकशी दरम्यान आरोपीने स्व:ताच्या मुलीचे दु:ख विसरण्यासाठी त्याने या चिमकुलीचे अपहरण केल्याचे स्पष्ट केले.

नाशिका जिल्हा शासकीय रुग्णालयात शनिवारी दुपारच्या सुमार ठाणे जिल्ह्यातून आलेल्या परप्रांतीय महिलेची एक वर्षाची चिमुकली तेथील बाकावर झोपली होती. याच संधीचा फायदा घेत आरोपी माणिकने आईची नजर चुकवून चिमुकलीचे अपहरण केले. आरोपीने तीन दिवस चिमुकलीला आपल्या घरात ठेवले होते. यावेळी संपूर्ण शहरात नाशिक पोलीस ठाण्यांचे गुन्हे शोध पथक चिमुकलीसह आरोपीचा शोध घेत होते. यासाठी पोलिसांनी नाशिक शहरासह शहराबाहेर देखील पोलीस पथके रवाना झाली. मात्र आरोपीचा शोध लागला नाही. यावेळी चिमुकलीच्या कुटुंबियांकडूनही चिमुकलीचा दिवस रात्र शोध सुरु होता. याचदरम्यान मंगळवारी पहाटे अपहरणकर्ता आरोपी बाळाला घेऊन जिल्हा न्यायालयासमोरील रस्त्याने जात असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली. यावेळी पोलिसांनी आरोपीला हटकारले असताना त्यानेच चिमुकलीचे अपहरण केल्याची माहिती उघड झाली. दोन महिन्यांपूर्वी स्वत:ची मुलगी मृत्युमुखी पडल्यामुळे या चिमुकलीचे अपहरण केल्याचे माणिक काळे याने पोलिसांना सांगितले. काळे याची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्याच्या आधीही अपहरणाचे गुन्हे दाखल आहेत का याची माहिती घेत आहेत.


हेही वाचा- लग्न समारंभांवर पुन्हा लक्ष

- Advertisement -

 

- Advertisement -