घरमनोरंजनअभिनेता पुनीत इस्सरचा ई-मेल हॅक करणारा आरोपी ताब्यात

अभिनेता पुनीत इस्सरचा ई-मेल हॅक करणारा आरोपी ताब्यात

Subscribe

टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणारा अभिनेता पुनीत इस्सरचे ईमेल हॅक करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या व्यक्तीने फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आणि 13.76 लाख आपल्या अकाऊंटमध्ये जमा करुन घेतले. या गुन्हेगाराने अभिनेता पुनीतचा ईमेल आयडी हॅक केले आणि त्यांच्या हिंदी नाटकाच्या प्रयोगाचे बुकिंग रद्द केले तसेच त्यांनी जे पैसे दिले होते ते आरोपीने आपल्या अकाऊंटमध्ये ट्रांसफर करुन घेतले. शनिवारी पोलिसांनी सांगितलं की, या आरोपीचे नाव अभिषेक सुशील कुमार नाराचण असून तो मुंबईतील मड येथे राहणारा आहे. हा पूर्वी पुनीत यांचा कर्मचारी होता.

नाटकासाठी केले होते थिएटरचे बुकिंग
हा सर्व प्रकार मंगळवारी झाला जेव्हा पुनीत इस्सर यांना आपल्या ई-मेलमध्ये काहीतरी गडबड झाल्याचं दिसलं. त्यांनी मुंबईच्या ओशिवारा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. खरंतर त्यांनी मुंबईमधील नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स(NSPA) येथे श्री राम-रामायणासाठी थेएटरचे बुकिंग केले होते. तसेच यासाठी त्यांनी 13.76 लाख रुपये भरले होते. हे नाटक 14 आणि 15 जानेवारी रोजी होणार होते.

- Advertisement -

अशाप्रकारे लावला आरोपीचा शोध
जेव्हा पुनीतने NCPA ला मेल करण्यासाठी ई-मेल आयडी सुरु करण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, कोणीतरी ई-मेलसोबत गडबड केल्याचे दिसले. शिवाय थिएटरच्या मालकांकडून समजलं की, पुनीतने त्यांना मेल करुन थिएटरचे बुकिंग रद्द करण्यास सांगितले आणि बुकिंगचे पैसे देखील परत करण्याची मागणी केली. पोलिसांनी बँक अकाऊंटचे डिटेल्स घेतले आणि आरोपीच्या मोबाईल नंबरच्या मदतीने त्याला अटक केली.

 

- Advertisement -

हेही वाचा :

वरुण धवनच्या ‘भेडिया’ने 2 दिवसात कमावले इतके कोटी

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -